International Women’s Day 2024: उत्पादन क्षेत्र अनुभवतेय स्त्रीशक्तीचा दबदबा; पहा काय म्हणतायत यशस्वी महिला

International Women’s Day 2024: भारताच्या उत्पादन क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून मोठे बदल घडत आहेत. कधीकाळी एक पुरुषप्रधान क्षेत्र मानल्या जाणाऱ्या या ठिकाणी आज अनेक महिलांनी कर्तृत्व बजावून दाखवत आहेत. आज आंतराष्ट्रीय महिलादिनाच्या निमिताने आज आपण अश्याच काही प्रेरणादायी महिलांविषयी घेणार आहोत, त्यांची याविषयीची मतं पाहणार आहोत. या महिला केवळ पारंपरिक विचारसरणीला आव्हान देत नाहीत तर पर्यावरणपूरक उत्पादनाचा पुरस्कारही मोठ्या उत्साहाने करत आहेत.

काय म्हणतायत प्रेरणादायी महिला? (International Women’s Day 2024)

“वास्तुशाश्त्राच्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी ज्ञान, जिद्द आणि निष्ठा हे सर्वात महत्वाचे असून त्यामध्ये लिंगभेदाला स्थान नाही, पूर्वीच्या काळात हा व्यवसाय पुरुषांपुरताच सीमित होता, हे खरेच. पण आता परिस्थिती बदलली आहे. सध्या ग्राहकांना उत्तम दर्जाची designs देणारा architects मिळणे हाच मुद्दा आहे आणि त्यासाठी ते पुरुष असो वा स्त्री, याकडे लक्ष दिले जात नाही.” :- Mitu Mathur, Director, GPM Architects and Planners

“Architecture, डिझायन आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. यापूर्वी पुरुषांचे वर्चस्व असलेल्या या क्षेत्रात त्यांनी आपली हुशारी, जिद्द आणि नेतृत्व कौशल्य दाखवून मोठी झेप घेतली आहे. भारताच्या पारंपरिक वास्तुशास्त्राच्या मूल्यांना आणि बांधकाम पद्धतींना नवीन रूप देण्यासाठी महिला उत्सुक आहेत. त्याचबरोबर, उपेक्षित स्मारकांचे आणि इमारतींचे जतन करण्यातही त्यांची मोलाची भूमिका मानावी लागेल. स्थानिक कला, संस्कृती आणि वारसा यांचा स्रोत म्हणून वापर करून महिला designers designs तयार करतात.” :- Vipul B Varshneya, Founder STHAPATI

“भारताच्या शहरांच्या स्वरुपात आणि लोकांच्या त्या अनुभवात बदल घडवून आणणाऱ्या वास्तुविद्या तज्ञ आणि शहरी नियोजकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे आणि यामध्ये लिंगभेद अगदीच दुय्यम दर्जाचा असतो. पण, वाढत्या शहरीकरणाच्या गुंतागुंती आणि हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जात असताना, येत्या काळात शहरी नियोजनात महिलांची भूमिका अधिकच बळकट होणार आहे(International Women’s Day 2024).” :- Sonali Rastogi, Founding Partner, Morphogenesis