बिझनेसनामा । सध्या देशभरात लग्नसराई सुरू झाली आहे. ज्यामुळे आता त्याच्याशी संबंधित विविध उद्योगांच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे. लग्नांमुळे कंपन्यांच्या वाढलेल्या उत्पन्नाचा फायदा आपल्यालाही घेता येऊ शकेल. त्यासाठी आपल्याला या कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवावे लागतील. मात्र, असे स्टॉक निवडणे गुंतागुंतीचे ठरू शकेल. अशा परिस्थितीत एखाद्या शेअर बाजारातील तज्ज्ञाचा सल्ला घेऊन आपल्याला संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवता येतील.
हे लक्षात घ्या की, देशभरात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळे होतात, ज्याद्वारे सुमारे $ 50 बिलियनचा व्यवसाय केला जातो. तर आज आपण अशा काही कंपन्यांच्या शेअर्सबाबतची माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये खरेदी करण्याचा सल्ला अनेक अनुभवी गुंतवणूकदारांनी दिला आहे. आजच्या या बातमीमध्ये आपण या शेअर्ससाठी देण्यात आलेली टार्गेट प्राईसची माहिती देखील जाणून घेणार आहोत.
रेमंड (Raymond)
लग्नसराईमध्ये कपड्यांची जोरदार विक्री होते. याकाळात कपडेही महागतात. अशा परिस्थितीत अजय केडिया यांनी रेमंडचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 1500 रुपयांच्या टार्गेट प्राईसने खरेदी करता येईल असे त्यांनी सांगितले. आज हे शेअर्समध्ये जबरदस्त तेजी आहे. दुपारी 3.10 च्या सुमारास, या शेअर्सने 7 टक्क्यांहून जास्तीने उसळी घेत 1297 रुपयांवर ट्रेड करत होते. त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1329 रुपये तर निच्चांक 493 रुपये आहे.
कल्याण ज्वेलर्स (Kalyan Jewellers)
लग्नसमारंभातही दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. अशा परिस्थितीत अजय केडिया यांनी कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेडचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. दिवाळीपर्यंत या स्टॉकने मोठा नफा दिला होता. मात्र, आज तो थोडा दबावाखाली असल्याचे दिसून आले. आज हे शेअर्स 0.63 टक्क्यांनी घसरून 102 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत आहे. अजय केडिया यांनी यासाठी 140 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 109.55 रुपये तर निच्चांक 55.05 रुपये आहे.
इंडियन हॉटेल्स कंपनी (Indian Hotels Company)
जवळपास 8 मोठ्या विश्लेषकांनी IHCL चे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तसेच केडिया कमोडिटीजचे अजय केडिया यांनी यासाठी 435 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. सध्या इंडिया हॉटेल्सचे शेअर्स 0.75 टक्क्यांच्या घसरणीसह 313 रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहेत. त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 349 रुपये तर निच्चांक 171 रुपये आहे.
इझी माय ट्रिप (Easy My Trip)
सध्या या कंपनीच्या शेअर्समध्ये जरा चढ-उतार होते आहे. सकाळच्या ट्रेडिंगमध्ये यामध्ये 2.5 टक्क्यांहून जास्तीने वाढ झाल्याचे दिसून आले. मात्र थोड्याच वेळात यामध्ये झपाट्याने घसरण झाली. सध्या त्याची किंमत सुमारे 403 रुपये आहे. त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 476.50 रुपये आणि निच्चांक 239 रुपये आहे.