Investment : आधी Micron, मग Google अन् आता Amazon!! अमेरिकन कंपन्यांकडून भारतात गुंतवणुकीचा पाऊस

बिझनेसनामा ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा देशासाठी आणि खास करून इथल्या उद्योगांसाठी चांगलाच फलदायी ठरत असल्याचे दिसत आहे. याचे कारण म्हणजे मोदींच्या भेटीनंतर अमेरिकेतील Micron, Google आणि Amazon या 3 बड्या कंपन्यांनी भारतात गुंतवणुक (Investment) वाढवण्याची तयारी केली आहे. त्यामुळे साहजिक देशात नोकऱ्या मोठ्या प्रमाणात मिळणार आहेत आणि देशातील तरुणाईला याचा थेट फायदा होणार आहे. मोदींच्या या दौऱ्यानंतर वरील तिन्ही कंपन्यांपैकी कोणती कंपनी किती रुपयांची गुंवतणूक करणार आहे आणि भारताला त्याचा कसा फायदा होईल हे आज आपण जाणून घेऊयात….

Micron

अमेरिकेतील सेमीकंडक्टर कंपनी मायक्रॉन भारतात 2.7 बिलियन डॉलरची गुंतवणूक (Investment) करणार आहे. मंत्रिमंडळाने नवीन सेमीकंडक्टर टेस्टिंग आणि पॅकेजिंग युनिट स्थापन करण्यासाठी मायक्रोनच्या गुंतवणुकीला मान्यता दिली आहे. मायक्रोन कंपनी गुजरात मध्ये सेमीकंडक्टर प्लांट उभारणार असून असून तो 2 पार्ट मध्ये डेव्हलप केला जाईल. यासाठी लागणारा खर्च म्हणून कंपनी स्वतः 82.5 करोड डॉलर इन्व्हेस्ट करेल आणि बाकी इन्व्हेस्टमेंट राज्य आणि केंद्र सरकारकडून करण्यात येईल. या प्लांट मध्ये पहिल्या टप्प्यात 500 हजार चौरस फूट नियोजित क्लीनरूमचा समावेश असेल. त्यानंतर 2024 मध्ये ते सुरु करण्यात येईल. मायक्रोन टेक्नॉलॉजीनुसार, दोन्ही टप्प्यांतून जवळपास 5,000 नोकऱ्या मिळण्याची शक्यता आहे तर 15,000 लोकांना नंतरच्या काळात नोकऱ्या मिळतील.

Google – (Investment)

Google भारतात 10 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी मोदींची भेट घेतल्यानंतर याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी गुजरातमध्ये ग्लोबल फिनटेक ऑपरेशन्स सेंटर उघडण्याची घोषणा केली. सुंदर पिचाई यांनी मोदींचे कौतुकही केलं. मोदी अमेरिकेत आल्यानंतर त्यांची भेट घेणं हा माझा सन्मान आहे. त्यांचे डिजिटल इंडियाचे व्हिजन इतर देशांसाठी ब्लू प्रिंटचे काम करत असल्याचेही पिचाई म्हणाले.

Amazon

नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर अॅमेझॉनचे सीईओ अँड्र्यू जेसी यांनी भारतात 15 बिलियन डॉलरची गुंतवणूक (Investment) करण्याचा निर्णय घेतला. Amazon ची ही गुंतवणूक आत्तापर्यंतची कंपनीची सर्वात मोठी गुंतवणूक मानली जात आहे. यापूर्वी ऍमेझॉनने भारतात ११ बिलियन डॉलरची गुंतवणूक केली होती. भारतात जास्तीत जास्त नोकऱ्या उपलब्ध व्हाव्यात तसेच लहान आणि मध्यम व्यवसायांना डिजिटल होण्यासाठी मदत व्हावी यासाठी अॅमेझॉन काम करणार असलयाचे अँड्र्यू जेसी यांनी स्पष्ट केलं. त्याचाच भाग म्हणजे 2025 पर्यंत भारतात 20 लाख नोकऱ्या देण्याचे वचन अॅमेझॉनने दिले आहे.