Investment In Maharashtra : महाराष्ट्रात सुरु होणार नवा प्रकल्प; 10 हजार कोटींची गुंतवणूक

Investment In Maharashtra : आपला महाराष्ट्र हा सर्व बाजूनी विकास झालेलं राज्य आहे. महाराष्टात गुंतवणुकीत , उद्योगधंद्यात कायमच अग्रेसर राहिला आहे. मधल्या काही काळात महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला गेल्याने आपली थोडीशी निराशा झाली होती. परंतु आता राज्यातील तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. कारण एप्रिल आशिया ही सिंगापूर येथील कंपनी महाराष्ट्रातील रत्नागिरी येथे नवीन प्रकल्प सुरु करणार आहे. यासाठी कंपनी 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास तयार आहे. हा प्रकल्प सुरु झाल्यास राज्यातील अनेक तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध होईल.

एप्रिल आशिया कंपनी नेमकं करते काय?

एप्रिल आशिया ही सिंगापूर मधली एक टिशू बनवणारी कंपनी आहे. रत्नागिरी किनारपट्टीच्या बाजूला सुमारे दोन एकर जागेवर हा प्रकल्प उभा करण्याचा या कंपनीचा मानस आहे. हि कंपनी टिशू निर्यात करण्याच काम करते आणि आता रत्नागिरीत कंपनी 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास तयार आहे. महाराष्ट्र राज्य शासनाकडून याला दुजोरा मिळालेला असून हि स्थानिकांसाठी रोजगाराची एक उत्तम संधी बनू शकते. कंपनीकडून बनवल्या जाणाऱ्या या टिशूना विमान तसेच इतर ठिकाणी मोठी मागणी आहे व किनारपट्टीच्या बाजूला जागा मिळाल्यास निर्यात कारण सोपं होणार असल्याने कंपनीकडून किनारपट्टीला महत्व दिलं जातंय.

इतरही संधी उपलब्ध होणार: Investment In Maharashtra

रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या काही काळात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होण्याची शकता आहे. उग्द्योग मंत्री उदय सामंत हे स्वतः संदर्भात देखरेख करत आहेत. आता कोकाकोला बनवणारी कंपनी, रेल्वेचे डबे बनवणारी कंपनी, पेपर मिल इत्यादी कारखाने या भागात उभे राहण्याची शक्यता आहे. या मुले समुद्र किअनर्यवरिल आयात आणि निर्यातीला मोठा फायदा होणार असून महाराष्ट्राला (Investment In Maharashtra) आणि खास करून रत्नागिरी जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होणार आहे.