Mutual Funds : बँकेच्या FD पेक्षा मिळवा जास्त रिटर्न

बिझनेसनामा । गेल्या काही वर्षांमध्ये म्युच्युअल फंड हे लोकांच्या गुंतवणुकीच्या सर्वांत पसंतीच्या पर्यायांपैकी एक ठरले आहेत. या द्वारे गुंतवणुक करून बँकेच्या एफडीपेक्षा जास्त रिटर्न मिळवता येतो. मात्र यामध्ये जोखीम देखील असते. म्युच्युअल फंडामधील गुंतवणुकीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे फंड मॅनेजर्सची सर्व्हिस. म्युच्युअल फंड देणाऱ्या कंपन्या इंडेक्सपेक्षा जास्त रिटर्न मिळवण्यासाठी प्रोफेशनल्सची निवड करतात.

मात्र, फक्त फंड मॅनेजर्सवरच अवलंबून राहणे हे गुंतवणूकदारासाठी कधीकधी धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीतून जास्त रिटर्न मिळविण्यासाठी, फक्त चांगली कामगिरी करणाऱ्या फंडाची निवड करणे पुरेसे ठरणार नाही तर वेळोवेळी त्याच्या कामगिरीचा आढावा घेणे देखील महत्त्वाचे आहे. यासाठी गुंतवणूकदारांनी काय करावे हे जाणून घेउयात …

डायरेक्ट फंडाची निवड करा

हे लक्षात घ्या कि, आपले पैसे डायरेक्ट प्लॅनमध्ये गुंतवून गुंतवणूकदारांना 1-1.5 टक्के जास्त रिटर्न मिळवता येईल. रेग्युलर म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीपेक्षा डायरेक्ट प्लॅन जास्त चांगला आहे कारण यामध्ये गुंतवणूकदारांना फंड हाऊसेसला ब्रोकरेज द्यावे लागत नाही. हे फक्त जे गुंतवणुकीवरच अवलंबून असते.

म्युच्युअल फंड लोड म्हणजे फंडातील शेअर्स खरेदी करण्यासाठी भरावे लागणारे शुल्क. फंड मॅनेजर्सचा सल्ला किंवा सर्व्हिस म्हणून याची परतफेड केली जाते. म्हणजेच, जर तुम्ही 10 हजार रुपये गुंतवत असाल तर गुंतवणूकदारांना फंड खरेदी करण्यासाठी 1 टक्के (100 रुपये) शुल्क भरावे लागेल. म्हणजे फक्त 9900 रुपये गुंतवले जातील. याउलट 10 हजार रुपये डायरेक्ट फंडामध्ये गुंतवले जातील.

SIP करा

आपल्या पैशांची एकरकमी गुंतवणूक करण्याऐवजी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे गुंतवणूक करा. याद्वारे, नियमितपणे थोड्या थोड्या प्रमाणात गुंतवणूक करून जास्त युनिट्स खरेदी करता येतील. तसेच एकरकमी गुंतवणुकीच्या विपरीत, एखाद्याला SIP साठी सर्वोत्तम वेळेबाबत विचार करण्याची गरज नाही. एकरकमी गुंतवणुकीतील गुंतवणूकदारांना जास्त रिटर्न मिळवायचा असेल तर बाजार कोसळण्याची वाट पहावी लागते. मात्र याचा अंदाज बांधणे जवळपास अशक्य असते.

इंडेक्स फंडामध्ये गुंतवणूक करा

डायरेक्ट प्लॅनप्रमाणेच, इंडेक्स फंडामधील गुंतवणुकीचा खर्च कमी असतो. मात्र, इंडेक्स फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा मुख्य फायदा म्हणजे तो मार्केट इंडेक्सच्या कामगिरीनुसार तयार केला जातो. याद्वारे धोका कमी होण्यास मदत होते.

गुंतवणुकीमध्ये विविधता आणा

आपले पैसे फक्त एकाच एसेट क्लासमध्ये गुंतवू नका. त्याऐवजी, गुंतवणूकदारांनी आपल्या जोखमीच्या क्षमतेच्याआधारावर एकापेक्षा जास्त एसेट क्लासमध्ये गुंतवणूक करणे योग्य ठरेल. यासाठी गुंतवणूकदारांना स्मॉल-कॅप, मिड-कॅप आणि लार्ज-कॅप म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करता येईल. तसेच ज्यांना जास्त जोखीम घ्यायची असेल त्यांनी स्मॉल-कॅप फंडांमध्ये जास्त पैसे गुंतवावे. हे लक्ष्य घ्या कि, स्मॉल-कॅप्समध्ये गुंतवणुकीवर जास्त रिटर्न देण्याची क्षमता असते.

डेट Vs इक्विटी इन्व्हेस्टमेंट

डेट फंडस् हे रिस्क-फ्री असतात आणि अपेक्षित रिटर्न देतात. याउलट, इक्विटी फंड कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात आणि जे बाजारातील जोखमीवर आधारित असतात. म्युच्युअल फंडांद्वारे डेट आणि इक्विटी फंडांमध्ये गुंतवणूक करता येते. वयानुसार, गुंतवणूकदारांची जोखीम कमी होते, त्यामुळे अशा गुंतवणूकदारांनी डेट फंडस्मध्ये जास्त भांडवल गुंतवावे. यामध्ये 100 अंकामधून आपले वय वजा करणे आणि ती संख्या इक्विटीमध्ये गुंतवणे हा त्याचा थंब रूल आहे. जर एखाद्या गुंतवणूकदार जास्त जोखीम घेऊ शकत असेल, तर तो निर्दिष्ट मर्यादेपेक्षा 10-15 टक्के जास्त गुंतवणूक करू शकतो.

परफॉरमन्स रिव्यू करत रहा

गुंतवणूकदारांनी वेळोवेळी आपल्या गुंतवणुकीची कामगिरी तपासत राहावी आणि गरज पडेल तेव्हा त्यांचे भांडवल योग्य फंडांमध्ये गुंतवावे. गुंतवणूकदारांनी आपली पोर्टफोलिओचे वर्षातून किमान एक किंवा दोनदा रिव्यू केले पाहिजे. फंडाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे नसेल तर बाहेर पडण्यापूर्वी इंडस्ट्रीची कामगिरी तपासली पाहिजे.