Investment Tips : ‘या’ लहान बचत योजनेमध्ये गुंतवणुक करून मिळवा कर सवलतीचा लाभ

बिझनेसनामा । लहान बचत योजना या गुंतवणुकीच्या लोकप्रिय पर्यायांपैकी एक आहेत. यामध्ये गुंतवणूक केलेल्या पैशांवर कोणतीही जोखीम नसते. हे लक्षात घ्या कि, पोस्ट ऑफिसकडून अनेक लहान बचत योजनांची ऑफर दिली जाते. यापैकीच एकीचे नाव आहे नॅशनल सेविंग्स सर्टिफिकेट (NSC) स्कीम. याद्वारे आपल्याला चांगल्या रिटर्नसोबतच टॅक्समध्ये सूट देखील मिळते.

कमी जोखीममध्ये मिळेल खात्रीशीर नफा

हे लक्षात घ्या कि, नॅशनल सेविंग्स सर्टिफिकेट ही भारत सरकारचा पाठिंबा असलेली एक टॅक्स बचत करणारी योजना आहे. जी देशातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून खरेदी करता येईल. यामध्ये चांगला नफा आणि कमी जोखीमीची खात्री देण्यात आली आहे. ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये ही योजना खूपच लोकप्रिय झाली आहे. हे लक्षात घ्या कि, बँकेच्या एफडीपेक्षा लहान बचत योजनांमध्ये सुंठवलेले पैसे लवकर दुप्पट होतात.

5 वर्षांचा मॅच्युरिटी कालावधी

या योजनेमध्ये आपल्याला कमीत कमी 1,000 रुपयांद्वारे गुंतवणूक सुरु करता येते. तसेच आपल्याला हवे असेल याहून जास्त रकमेची देखील NSC खरेदी करता येईल. 5 वर्षांचा मॅच्युरिटी कालावधी असलेल्या या योजनेसाठी सध्या 6.8 टक्के दराने वार्षिक व्याज दिले जात आहे, जे FD पेक्षा जास्त आहे. तसेच यामध्ये गुंतवणूक करून आपल्याला आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत टॅक्स सूट देखील मिळेल. मात्र, ही सूट फक्त 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवरच उपलब्ध असेल. यामध्ये 100, 500, 1000, 5000, 10,000 किंवा त्याहून जास्त रकमेचे सर्टिफिकेट उपलब्ध आहेत.

NSC चे 3 प्रकार

NSC घेण्याचे मुख्यतः तीन मार्ग आहेत. यातील पहिला म्हणजे सिंगल होल्डर टाइप सर्टिफिकेट. या अंतर्गत, कोणत्याही व्यक्तीला स्वतःसाठी किंवा अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने पालक म्हणून NSC खरेदी करता येतील. यातील दुसरा म्हणजे, जॉईंट ‘ए’ टाइप सर्टिफिकेट आहे. यामध्ये दोन गुंतवणूकदारांना मिळून NSC खरेदी करता येतील. तसेच मॅच्युरिटीची रक्कम दोघांना समान भागांमध्ये दिली जाईल. यातील तिसरा म्हणजे जॉईंट ‘बी’ टाइप सर्टिफिकेट. हे देखील दोन लोकांना मिळून खरेदी करता येतील, मात्र यामध्ये मॅच्युरिटीची रक्कम फक्त एकालाच दिली जाईल.

हे लक्षात घ्या कि, कोणत्याही भारतीय नागरिकाला NSC मध्ये गुंतवणूक करता येतील. यामध्ये प्रौढ व्यक्ती, वैयक्तिकरित्या किंवा जॉईंटपणे (3 प्रौढांपर्यंत), 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने पालकांना NSC मध्ये गुंतवणूक करता येईल. कोणत्याही अनिवासी भारतीय नागरिकाला NSC खरेदी करता येणार नाही. तसेच, NRI होण्याआधीच त्यांच्याकडे NSC असेल तर ती मॅच्युर होईपर्यंतच कायम ठेवता येईल.