बिझनेसनामा ऑनलाईन । आपण नेहमीच अशी खटपट करतो कि कष्ट करून कमावलेले पैसे कुठल्या तरी सुरक्षित ठिकाणी सांभाळून ठेवावे, ज्यावर चांगला रिटर्नही मिळेल. काही दिवसांपूर्वीच दिवाळीचे चार पाच दिवस संपले आणि हा काळ गुंतवणुकीसाठी किंवा नवीन वस्तूंच्या खरेदीसाठी उत्तम मानला जात असल्यामुळे नक्कीच तुम्ही देखील कुठे तरी नवीन गुंतवणूक सुरु केलीच असेल, पण व्यवस्थित माहितीच्या अभावी किंवा काही इतर कारणास्तव जर का तुम्ही अजूनही गुंतवणुकीला सुरुवात केलेली नसेल तर काळजी करू नका कारण आज आम्ही असे काही पर्याय सुचवणार आहोत (Investment Plans) जे नक्कीच तुमच्या फायद्याचे असतील..
१) RBI Bonds:
चांगल्या परताव्याच्या शोधात असलेल्या गुंतवणूकदाराने कधीही फ्लोटिंग रेट सेव्हिंग बॉन्डमध्ये गुंतवणूक करावी, यांना सामान्य भाषेत RBI Bonds असंही म्हटलं जातं. फ्लोटिंग रेट असल्यामुळे याचा व्याजदर किंवा त्याचा कार्यकाळ हा नेहमीच बदलत राहतो. दर सहा महिन्यांनी जानेवारी 1 आणि जुलैच्या 1 तारखेला व्याजदर बदलतात. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट नुसार हे व्याजदर ठरवले जातात.
२) VIP: Investment Plans
गुंतवणुकीचा हा पर्याय नोकरदार वर्गासाठी खास उपयुक्त ठरणारा आहे. VPF म्हणजेच वॉलेंटरी प्रोव्हिडंट फंड, या गुंतवणुकीची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे तुम्हाला सरकारच्या EPF (Employees Provident Funds) खात्यावर जेवढं व्याज दिलं जातं तेवढंच व्याज दिलं जाईल. या योजनेचा लॉकइन कालावधी पाच वर्षांचा असतो व तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम 80 C च्या अंतर्गत कर सवलतीचा लाभ दिला जातो.
३) SIP:
SIP गुंतवणूक हि आजच्या जमान्यात अनेक जणांच्या पसंतीस उतरत आहे. अनेक गुंतवणूक सल्लागारांकडून SIP गुंतवणुकीचा विचार सुचवला जातो. त्यामुळे अश्या या उत्तम परतावा देणाऱ्या पर्यायांमध्ये नक्कीच गुंतवणूक केली जाऊ शकते. SIP मार्केट लिंक्ड असल्यानं त्यात निश्चित व्याजाची हमी दिली जात नाही, तरीही इथे दीर्घकालीन 12 टक्क्यांचा परतावा नाकीच मिळू शकतो. त्यामुळे जर का तुम्ही मोठी रक्कम गुंतवण्याच्या विचारात असाल तर SIP हा एक उत्तम पर्याय असू शकतो, कारण जेवढ्या जास्ती काळासाठी तुम्ही रक्कम गुंतवाल (Investment Plans) तेवढाच मिळणारा रिटर्न अधिक असेल.