बिझनेसनामा ऑनलाईन । आपण बऱ्याचदा फिक्स डिपॉझिट मध्ये पैसे गुंतवत असतो. पण त्यापेक्षा जास्त फायदेशीर असलेल्या सरकारी योजनेबद्दल (Investment Schemes) तुम्हाला माहिती आहे का? NSC म्हणजेच नॅशनल सेविंग सर्टिफिकेट ही अशी योजना आहे ज्यामध्ये फिक्स डिपॉझिट च्या तुलनेमध्ये जास्त व्याज आणि सुरक्षित गुंतवणुकीची हमी देखील देण्यात येते. सध्या SBI आणि ICICI बँक FD वर जितकं व्याज देत आहे त्यापेक्षा जास्त व्याजदर तुम्हाला NSC मध्ये मिळत आहे. त्यामुळे या योजनेत गुंतवणूक करणं नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
किती रुपयांपासून सुरुवात कराल-
नॅशनल सेविंग सर्टिफिकेट मध्ये (Investment Schemes) गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 1000 रुपये भरावे लागतात. हे खाते अल्पवयीन व्यक्तीच्या नावावर उघडता येते. त्याचबरोबर या योजनेमध्ये जॉईंट खाते उघडण्याची सुद्धा सुविधा आहे. यासाठी मॅच्युरिटी कालावधी आणि लॉक इन कालावधी सुद्धा पाच वर्षाचा देण्यात आलेला आहे. नॅशनल सेविंग सर्टिफिकेट मध्ये जमा करण्यात आलेल्या या रकमेला कायद्याअंतर्गत 1961 च्या कलम 80 c अंतर्गत सूट देण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्ही गुंतवलेल्या किमतीवर दीड लाख रुपये पर्यंतची आयकर सूट मिळवण्यासाठी दावा करू शकतात. त्याचबरोबर पाच वर्षांनी मुदत संपल्यानंतर तुम्ही या योजनेचे नूतनीकरण करू शकत नाही. जर तुम्हाला पुन्हा गुंतवणूक करायची असेल तर सुरू असलेल्या व्याजदराने नवीन सुरुवात करावी लागेल.
जर आपण NSC मध्ये (Investment Schemes) एक लाख रुपयांची गुंतवणूक केली तर पाच वर्षांच्या मॅच्युरिटी वर 1 लाख 44 हजार 903 रुपये तुम्हाला मिळू शकतात. जर तुम्ही दहा लाख रुपये गुंतवलेले असतील तर 7.7 टक्के व्याजदरानुसार 1 लाख 49 हजार 034 रुपये मिळवू शकतात. म्हणजे व्याजाचा फायदा 4 लाख 49 हजार 034 रुपये एवढा मिळू शकतो.
कशी करावी गुंतवणूक – (Investment Schemes)
जर तुम्हाला नॅशनल सेविंग सर्टिफिकेट या योजनेमध्ये गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन अर्ज सादर करावा लागतो. त्याचबरोबर https://www.indiapost.gov.in/VAS/Pages/Form.aspx#savingcertificates या वेबसाईटवर जाऊन देखील अर्ज तुम्ही सादर करू शकतात.