बिझनेसनामा ऑनलाईन । भारतात महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होताना आपल्याला दिसत आहे. महिलांनी मोठ्या पदावर बाजी मारून त्यांचे वर्चस्व टिकून ठेवलेले आहे. बऱ्याचदा आपल्याला बसेस किंवा रेल्वेमधून महिला जॉब ला जाण्यासाठी प्रवास करताना दिसतात. तर कुठेही ठिकाणी गेल्यावर आपल्याला महिलांकडे काही पद दिलेले आढळतात. नोकरीमुळे महिला आर्थिकदृष्टया सक्षम झाल्या आहेत. अशावेळी पैशाची गुंतवणूक कुठे करावी असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला असेल आज आम्ही तुम्हला गुतवणूकीचे ५ पर्याय सांगणार आहोत.
1) राष्ट्रीय पेंशन योजना (National Pension Scheme)
राष्ट्रीय पेंशन योजना ही पेंशन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण ( PFRDA) यांच्या नियंत्रणाखाली येते. सेवानिवृत्ति पैसे बचतीसाठी, भारत सरकारने बाजाराशी संबंधित बचत कार्यक्रम NPS (National Pension System) लॉन्च केला आहे. या योजनेअंतर्गत आपली गुंतवणूक ही इक्विटी, कॉर्पोरेट बॉन्ड, लिक्विड फंड, सरकारी बॉन्ड आणि निश्चित वित्तीय या सारख्या पर्यायांमध्ये केली जाते. ICICI नुसार ही योजना आपल्याला आपल्या निवेश फंड मॅनेजर, फंड विकल्प, वार्षिकी सेवा प्रदाता आणि वार्षिकी विकल्प निवडण्याची स्वतंत्रता देते.
2) फिक्स्ड डिपॉजिट (Fixed Deposit)
फिक्स्ड डिपॉजिट (FD)हा देखील गुंतवणूक करण्यासाठी एक महत्वाचा पर्याय ठरू शकतो. तुम्ही FD करून तुमचे पैसे ठराविक काळासाठी गुंतवू शकतात . ह्या पर्यायात तुमची गुंतवणूक सुरक्षित तर राहतेच शिवाय तुमच्या गुंतवणुकीवर चांगल्या प्रकारचे व्याज देखील तुम्ही मिळवू शकतात.
3) म्यूचुअल फंड SIPs –
म्यूचुअल फंड हा पर्याय देखील गुंतवणुकीसाठी उत्तम ठरू शकतो. तुमची पैशाच्या बाबतीत जोखीम घ्यायची क्षमता असल्यास म्यूचुअल फंड मध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकतात. आपण म्यूचुअल फंड मधील इक्विटी, डेब्ट, किंवा हायब्रिड फंडमध्ये गुंतवणूक करू शकता.
4) गोल्ड इन्वेस्टमेंट-
यामध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी बरेच प्रकार आहेत, जसे की सिक्के, बार, गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड, गोल्ड फंड, सॉवरेन गोल्ड ब्रॉन्ड यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकतात.
5) हेल्थ इन्शुरन्स-
आपले आरोग्य आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची असते. त्याचबरोबर आपला आणि आपल्या परिवारांचा हेल्थ इन्शुरन्स करणं खूप महत्त्वाचं आहे. सर्वसमावेशक आरोग्य विमा कव्हरेज या परिस्थितींमध्ये तुमच्या बचतीचे रक्षण करताना तुमचा वैद्यकीय खर्च कव्हर करेल.