बिझनेसनामा ऑनलाईन । भविष्यात आर्थिकदृष्ट्या कोणतीही अडचण येऊ नये म्हणून आपण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपले पैसे सेविंग करून ठेवत असतो. पैशाची गुंतवणूक करून ठेवणे प्रत्येकासाठी गरजेचं आहे. परंतु पैशाची गुंतवणूक करत असताना सुरक्षित ठिकाणी आणि ज्यादा रिटर्न कुठे मिळेल याचा विचार करून आपण निर्णय घेत असतो. तुम्ही सुद्धा आपले पैसे कुठे गुंतवावे याबाबत गोंधळाच्या स्थितीत असाल तर तुमच्याकडे Post Office FD आणि PPF अशा २ सर्वोत्तम योजना आहेत. यामध्ये नेमका किती रिटर्न मिळतो याबाबत जाणून घेऊया.
पोस्ट ऑफिस एफडी (Post Office FD)-
ही एवढी म्हणजे बँकेसारखंच काम करते. या योजनेचा फायदा घेण्यासाठी तुम्ही कोणताही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन तुमचं अकाउंट ओपन करू शकता. यामध्ये दिलेल्या वेळेमध्ये पैसा जमा करावा लागतो. जमा केलेल्या पैशांवर तुम्हाला गॅरंटी सोबत रिटर्न सुद्धा दिला जातो. सध्या या स्कीम मध्ये 6.9 टक्के रिटर्न मिळत आहे. त्याचबरोबर तीन वर्षापर्यंत जर तुम्ही पैसे भरत राहिला तर 7 टक्के आणि 5 वर्षांसाठी 7.5% रिटर्न देण्यात येतो.
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड – PPF
पब्लिक प्रोव्हिडंट फंड योजनेत (PPF Scheme) गुंतवणूक केल्यास चांगला रिटर्न मिळतो. या योजनेत मोठ्या रक्कमेची बचत होते. या योजनेमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जास्त काळापर्यंत आपण यामध्ये गुंतवणूक करू शकतो. या पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अकाउंट वर वर्षभरात 7.1% इंटरेस्ट रेट मिळत आहे. ही सुद्धा एक सरकारी योजना असल्यामुळे तुमचे पैसे सुरक्षित राहतात. तसेच PPF मध्ये गुंतवणूक केल्यास कर सवलत सुद्धा मिळते.
वरील दोन्ही योजनांपैकी कोणत्याही योजनेत तुम्ही तुमच्या पैशाची सुरक्षित गुंतवणूक करू शकता. तुम्हाला जर जास्त कालावधीसाठी पैशाची गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी PPF ही बेस्ट स्कीम ठरेल. दुसरीकडे FD मध्ये गुंतवणूक करायचं म्हंटल तर सोप्प आहे परंतु त्यातील व्याजावर टॅक्स बसू शकतो.