Investment Tips : देशात तसेच जागतिक स्तरावर महागाईचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अगदी जेवणाच्या ताटापासून ते इतर गरजा पुरवण्यासाठी आपल्याला मोठी रक्कम मोजावी लागते. अनेक वेळा हातात नोकरी असून देखील हा खर्च भागत नाही. कित्येक लोकं वेळोवेळी पैशांची बचत करण्यासाठी वेगवेगळ्या गुंतवणूक योजनांचा वापर करत असतात. तसेच अनेकजण विश्वासू माणसांच्या मदतीने पैशांचे नियोजन करतात. आम्ही देखील आज तुम्हाला गुंतवणूक करण्याचा किंवा पैसे वाचवण्याचा एक सोपा मार्ग सुचवणार आहोत…
अशाप्रकारे मिळवा साईड इन्कम : (Investment Tips)
पैशाला आता आपण मूलभूत गरजांपैकी एक म्हटलं तरीही ते वावगं ठरणार नाही. कारण दिवसेंदिवस वाढणारी महागाई ही प्रत्येक सामान्य माणसावर आर्थिक बोजा बनत चालली आहे. समजा तुम्हाला महिन्याला 50 हजार रुपये मिळत असतील तर यातील निदान 30 टक्के हिस्सा तुम्ही अगदी न चुकता बाजूला काढून ठेवला पाहिजे. आजूबाजूच्या तरुणांकडून तुम्ही नेहमीच “माझे पैसे मला पुरत नाहीत” अशी तक्रार ऐकलीच असेल. याचे प्रमुख कारण काय तर हातात येणारा पैसा हा कमी असून त्यातूनच जास्तीत जास्त खर्च भागवला जात आहे. आणि मग भविष्यातील नियोजनांसाठी पुरेशी रक्कम हातात बाकी उरत नाही. अशावेळी गरज असते ती योग्य नियोजनाची (Investment Tips). आपण मनाशी पक्की खूण गाठ बांधली पाहिजे की मिळालेल्या पगारातून अमुक एक रक्कम आपण थेट बाजूला काढून ठेवणार आहोत, त्या रकमेला कोणत्याही परिस्थितीत हात लावला जाणार नाही. हा फॉर्मुला वापरून तुम्ही नक्कीच भविष्यासाठी अधिकाधिक पैसे जपून ठेवू शकता.
हा फॉर्मुला नेमका काय आहे?
अगदीच उदाहरण देऊन स्पष्ट करायचं झालं तर, जर का तुम्ही महिन्याला 50 हजार रुपये कमवत असाल तर त्यातील 30 टक्के हिस्सा हा वेळोवेळी बाजूला काढून ठेवावा (Investment Tips). म्हणजेच महिन्याला तुम्ही 15 हजार रुपये बचत म्हणून बाजूला काढून ठेवत आहात. बाजारात गुंतवणूक करण्याच्या अनेक योजना उपलब्ध आहेत तुम्ही म्युच्युअल फंड किंवा स्मॉल इन्व्हेस्टमेंटचा वापर करू शकतात. SIP मध्ये 15 हजार रुपयांची मासिक गुंतवणूक केल्यानंतर दहा वर्षात तुम्हाला 15 टक्के रिटर्न म्हणजेच 41,79,859 रुपये परत मिळतील. आणि हीच गुंतवणूक जर का तुम्ही पाच वर्षांसाठी करत असाल तर त्यावर 13 लाख रुपये एवढा मोठा रिटर्न मिळवला जाऊ शकतो.
मेहनत आणि कष्टाच्या जोरावर तुम्ही कामाच्या क्षेत्रात नेहमीच प्रगती करता आणि रिसर्चच्या मांडणीनुसार अधिक तर लोकांना मिळणारा पगार हा सात ते आठ वर्षात नक्कीच द्विगुणीत होत असतो. त्यामुळे आत्ता 50 हजार कमावणाऱ्या तुमच्याकडे येत्या काही वर्षातच एक लाख रुपयांपर्यंत पैसे कमावण्याची ताकद नक्कीच तयार झालेली असेल. जस-जसा आपला पगार वाढत जातो तशी गुंतवणुकीची रक्कम वाढवावी(Investment Tips) जेणेकरून येणाऱ्या काळात आर्थिक चणचण भासणार नाही.