Investment Tips : मुलांच्या भविष्यासाठी पैशांची सुरक्षित गुंतवणूक करायची आहे? मग ही बातमी वाचाच

Investment Tips: देशातील महागाई ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आपला भारत देश हा प्रामुख्याने मध्यमवर्गीय लोकांचा देश असल्यामुळे या महागाईचा सामना करणं आपल्यासाठी आलेल्या दिवशी अधिकाधिक कठीण बनत चाललाय. प्रत्येक पालकाला आपल्या मुलांच्या शिक्षणाबद्दल आणि त्यांच्या भावी जीवनाबद्दल नेहमीच चिंता सतावत असते. आपण करणारी गुंतवणूक योग्य आहे ना, यामुळे आपल्या मुलांची आर्थिक गरज भागवली जाईल की नाही अशी चिंता त्यांना वाटत असते. तुम्ही देखील जर का असाच विचार करत असाल तर आज आम्ही तुमच्याशी याबाबत काही कल्पना शेअर करणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत नक्की वाचा.

हा काळ आहे महागाईचा:

आपण जगत असलेला काळ हा खरोखरच महागाईने ग्रासलेला आहे. उच्च शिक्षणच नाही तर आज काल प्राथमिक शिक्षण मिळवण्यासाठी सुद्धा लाखो रुपये खर्च करावे लागतात, मुलांचे शिक्षण आणि त्यानंतर त्यांचे लग्न करणं ही मध्यमवर्ग कुटुंबासाठी एक मोठी चिंतेची गोष्ट बनत चाललेली आहे. एवढा पैसा आपल्या पगारातून नेमका कसा उभा करावा, येणाऱ्या काळात आर्थिक नियोजन (Investment Tips) कसं करावं असे अनेकांच्या मनात हजारो प्रश्न निर्माण होत असतात.

आर्थिक नियोजनासाठी नेमकं काय करावे? (Investment Tips)

नियोजन हे कोणत्याही बाबतीत फारच महत्त्वाचे आहे. नियोजनाशिवाय केलेली कोणतीही गोष्ट ही असफल व्हायला वेळ लागत नाही, पैसा हा आजच्या जगात टिकाव लागण्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे आणि एवढ्या महत्त्वाच्या गोष्टीबाबत हलगर्जेपणा करणं हे कोणालाही परवडणार नाही. मला येणाऱ्या काळात किती खर्च करावा लागू शकतो याचा विचार करा आणि त्याप्रमाणे तुमचं नियोजन करा, शिक्षण क्षेत्रात कशाप्रकारे दरवाढ होत आहे, ती दरवाढ किती टक्क्यांची आहे आणि किती काळासाठी आहे हे आकडे पाहून घ्या. सध्याच्या खर्चाानुसार येणाऱ्या काळात आपल्याला किती खर्च करावा लागू शकतो याची गणना तयार करा. कारण यानंतर येणाऱ्या काळात तुम्हाला एकूण किती पैसा खर्च करायचा आहे याचा एकूण अंदाज तुमच्या जवळ असेल.

गुंतवणूक कुठे कराल?

आपली गुंतवणूक (Investment Tips) ही अशा ठिकाणी असली पाहिजे जिथून मिळणारा रिटर्न हा मोठा असेल. तात्काळ उद्दिष्टांसाठी बचत खाती, एफडी, लिक्विड शॉर्ट डेटा यांचा वापर करा. आणि काही वर्षांनी जो खर्च करायचा आहे त्याचा म्युचल फंड, सोनं आणि सरकारकडून दिल्या जाणाऱ्या विविध योजनांचा विचार करा. SIP योजनेवरचा विश्वास आजकाल दिवसेंदिवस वाढत चालला आहे जर का तुम्हाला मोठा रिटर्न मिळवायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या गुंतवणुका नक्कीच करू शकता.

लक्षात घ्या की सर्वसाधारणपणे महागाई सुमारे आठ टक्क्यांनी वाढत असते, आणि शिक्षण क्षेत्रातील महागाई हे सुमारे दहा टक्क्यांच्या दराने वाढते. हा आकडा लक्षात ठेवून दहा ते पंधरा वर्षांच्या दीर्घकालीन उद्दिष्ट्यांसाठी तुम्ही गुंतवणूक करायला सुरुवात करा, इथे मिळणारा रिटर्न हा तुमच्यासाठी फार महत्त्वाचा असल्या कारणाने तो तुमच्या मुलांचे भविष्य नक्कीच उज्वल करू शकतो.