iPhone In India : आता iPhone बनणार ‘मेड इन इंडिया’ ; रतन टाटा आणणार बाजारात नवीन लाट

iPhone In India : या जमान्यात हातात मोबाईल नाही अशी व्यक्ती क्वचितच पाहायला मिळेल. हातात मोबाईल असणं ही एक सहाजिक गोष्ट आहे, कारण आजकाल अनेक गोष्टी ह्या केवळ मोबाईलद्वारे पूर्ण केल्या जाऊ शकतात आणि त्यातल्या त्यात जर का कोणाच्या हातात iPhone असेल तर त्या व्यक्तीची ऐटच काही वेगळी असते. कदाचित तुम्ही याआधी देखील वाचलंच असेल की रतन टाटा हे भारतीय बाजारात iPhone ची मॅन्युफॅक्चरिंग (manufacturing) करण्याच्या विचारात आहेत आणि आता याच विचाराला भारत सरकारकडून होकार मिळाल्यामुळे लवकरच आपल्याकडे iPhone तयार होऊ शकतात.

भारतात तयार होणार का iPhone? (iPhone In India)

आपल्या सरकारकडून देशांतर्गत iPhone च्या मॅन्युफॅक्चरिंगला परवानगी मिळालेली आहेत. भारतीय स्पर्धा आयोगाने टाटा समूहाला हिरवा झेंडा दाखवल्यामुळे आता लवकरच भारतात देखील iPhone ची निर्मिती होऊ शकते. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात टाटा इलेक्ट्रॉनिक्स (Tata Electronic) या कंपनीने तैवांनच्या विस्ट्रॉनचे भारतीय ऑपरेशन्स विकत घेण्यासाठी एक करार केला होता.

तर एकूण परिस्थिती अशी आहे की, विस्ट्रॉनला भारतातील iPhone बिझनेस मधून बाहेर पडायचे तर टाटा कंपनीला हा व्यवसाय विकत घेण्याची इच्छा आहे. बेंगलोर जवळ सध्या विस्ट्रॉनचे एक प्लांट सुरू आहे जिथे iPhone असेंबलींग होते आणि टाटा समूहासोबत त्यांची गेल्या एका वर्षापासून या कराराबद्दल चर्चा सुरू आहेत. बंगलोर जवळ असलेला हा प्लांट iPhone-14 मॉडेलच्या प्रोडक्शनसाठी ओळखला जातो, ज्यात आत्ताच्या घडीला जवळपास 10 हजार पेक्षा अधिक कर्मचारी काम करीत आहेत. एकतर भारतात iPhone तयार करणारी ही एकमेव कंपनी आहे(Production Company) जी वर्ष 2008 मध्ये भारतात आली होती 2017 पर्यंत त्यांनी आपला व्यवसाय वृद्धिंगत केला आणि देशात iPhone चे प्रोडक्शन सुरू केले होते(iPhone In India). लक्षात घ्या की तैवानच्या एकूण 3 कंपन्या भारतात iPhone मॅन्युफॅक्चरिंग करण्याचे काम करतात त्यापैकी विस्ट्रॉनचा भारताच्या बाजारातून बाहेर पडण्याच्या विचारात आहे मात्र बाकी दोन कंपन्या भारतात व्यवसाय विस्तृत करण्याच्या मार्गावर आहेत.