iPhone Production In India: गेल्या अनेक दिवसांपासून टाटा कंपनी देशात iPhone तयार करण्याचे नियोजन आखत आखत आहे. आणि आता हि आखणी प्रत्यक्षात उतरणायची वेळ आलेली असून हि दिग्गज कंपनी तामिळनाडूच्या होसूर या भागात सगळ्यात मोठा iPhone मॅन्युफॅक्चरिंग प्लँट बनवण्याच्या तयारीत आहे. टाटा कंपनीची हि योजना जर का सत्यात उतरली तर देशातील 50,000 नवीन लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. हा प्लांट देशातील सर्वात मोठा iPhone असेम्ब्ली प्लांट ठरेल. अलीकडेच कंपनीने माध्यमांना या नवीन योजनेबद्दल माहिती दिली असल्यामुळे देशातील बेरोजगारांना नवीन आशेचा किरण मिळाला आहे. iPhoneचा चाहतावर्ग आपल्या देशात काही कमी नाही, ज्याच्या हातात iPhone तो माणूस सर्वात श्रीमंत समजला जातो, आपोआपच गटामध्ये त्याची वाहवा होते.
टाटा समूह देशात बनवणार Iphone : (iPhone Production In India)
टाटा कंपनी हि देशातील अनेक दिग्गज कंपन्यांपैकी एक आहे, तरुणांमध्ये वाढणारी Apple फोनची क्रेज पाहून कंपनीने हा नवीन निर्णय घेतला आहे. या नवीन फेक्टरीमध्ये 20 पेक्षा अधिक असेम्ब्ली लाईन तयार केल्या जातील आणि हा प्रकल्प रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध करवणार आहे. येत्या 12 ते 18 महिन्यांत म्हणजेच एक ते दीड वर्षाच्या कालावधीनंतर टाटा समूह या प्रकल्पाचे उदघाटन करेल. टाटा समूहाच्या या नवीन प्रकल्पामुळे एप्पल कंपनीची सप्लाय चेन लोकलाईज होईल आणि यानंतर एप्पल सोबत समूहाचा संबंध देखील अधिक दृढ होऊ शकतो.
देशातील इतर राज्यांबद्दल बोलायचं झालं तर टाटा समूहाची एक फेक्टरी कर्नाटक राज्यात आधीपासूनच कार्यरत आहे आणि आता तामिळनाडूमध्ये सुरु होणार हा नवीन प्रकल्प देशातील सर्वात मोठा प्रकल्प असण्याची शक्यता आहे (iPhone Production In India). टाटा समूहाकडून होसूरच्या भागात अगदी जोमाने या प्रकल्पाचे काम सुरु असून जवळपास 5000 लोकं हा प्रकल्प उभारण्याच्या प्रक्रियेत घाम गाळत आहेत. समूहाकडून या प्लांटवर काम करण्यासाठी हुशार, मेहनती आणि कर्तबगार लोकांची निवड प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. देशांतर्गत Apple चे मोबाईल तयार होऊ लागले कि आपोआपच त्यांच्या किमती देखील कमी होतील अशी आशा तज्ज्ञांनी व्यक्त केली.
आशियात iPhone च्या निर्मितीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न
कर्नाटक राज्यात टाटा समूहाकडून विस्ट्रोन या कंपनीकडून एक प्लांट विकत घेण्यात आला होता. या मागे iPhone ची जास्तीत जास्त निर्मिती देशात व्हावी असाच आमचा उद्देश आहे असे समूहाने स्पष्ट केले होते. यावेळी समूह आणि विस्ट्रोन कंपनीमध्ये झालेला करार एकूण 123 मिलियन डॉलर्सचा होता. या प्रकल्पामध्ये 10000 पेक्ष्या जास्त कर्मचारी काम करतात आणि त्यांनी 1.4 अरब डॉलरच्या शिपिंगचे उद्दिष्ट गाठण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे (iPhone Production In India). सध्या बाजारातील कंपन्या Apple कंपनीकडून मिळणाऱ्या कमी मार्जिनमुळे त्यांच्यासोबाबत गुंतवणूक करताना चाचरत आहेत, तिथेच टाटा समूहाने टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या अंतर्गत सर्वात मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला असल्याने सर्वांच्या नजरा कंपनीकडे खिळून आहेत.