IPL 2024 : दुबईमध्ये होणार खेळाडूंचा लिलाव; पहा तारीख आणि वेळ

बिझनेसनामा ऑनलाईन । आपण ज्याला ‘इंडिया का त्योहार’ म्हणतो तेच IPL आता पुन्हा एकदा आपल्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. हा देशातील सर्वात मोठा क्रिकेटचा मेळा आहे ज्याच्या चर्चा सात समुद्रा पार सुद्धा ऐकायला मिळतात. इथे देशी आणि विदेशी खेळाडू एकत्र येऊन खेळतात आणि IPLचा चाहतावर्ग देखील अमाप आहे. त्यातच आता क्रिकेटप्रेमींसाठी आता एक आनंदाची वार्ता समोर आली आहे ती म्हणजे IPL 2024 चा लिलाव. डिसेंबर महिन्यात दुबईमध्ये हा लिलाव होणार आहे आणि त्यानंतर कुठल्या गटात कुठले खेळाडू सामील झालेत हे स्पष्ट होईल.

IPL 2024 चा लिलाव दुबईत:

जगभरात दर्जेदार क्रिकेटचा कुंभमेळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या IPL ची पहिली आणि महत्वाची स्टेप असते ती म्हणजे लिलावाची. प्रत्येक गटाच्या मालकांकडून काही खेळाडूंना लिलावासाठी बाहेर काढण्यात येतं आणि कुठला तरी वेगळा गट त्यांची गरज आणि परिस्थिती नुसार नवीन खेळाडूंची निवड करत असतो. यंदा हाच लिलाव दुबईमध्ये होणार आहे. 19 डिसेंबर अशी तारीख यासाठी पक्की करण्यात आली आहे. आणि भारताबाहेर होणारा हा पहिलाच IPL चा लिलाव असणार आहे.

IPL मधल्या प्रत्येक गटाला 26 नोव्हेंबर पर्यंत लिलावात उतरवण्यात येणाऱ्या खेळाडूंची नावं समोर आणण्याचा आदेश देण्यात आला आहे. आणि प्रत्येक गटाला 100 कोटी रुपयांसह लिलावात उतरण्याची संधी मिळणार आहे. मागच्या वर्षी हीच रक्कम 95 कोटी रुपये होती. परंतु यंदा यामध्ये वाढ करण्यात आली आहे. लिलावाच्या दिवशी प्रत्येक संघाला किती खर्च करावा लागतो? हे 2023 च्या लिलावात त्यांच्या न खर्च केलेल्या पर्स व्यतिरिक्त त्यांनी रिलीज केलेल्या खेळाडूंच्या किमतीवर अवलंबून असते.