IPL Auction 2024 : होणार जगभरातली सर्वात मोठी बोली; कोण ठरेल महागडा खेळाडू?

IPL Auction 2024 : लवकरच देशात IPL म्हणजेच क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा सुरु होणार आहे. IPLची क्रेज पाहिली तर याला “इंडिया का त्योहार” का म्हणतात याची प्रचिती येते. देश विदेशातून सर्वोत्तम क्रिकेटपटू इथे येऊन आपले कौशल्य प्रस्तुत करतात. IPL देशातील नवख्या खेळाडूंसाठी उपलब्ध होणारी सर्वात मोठी संधी म्हणावी लागते, कारण एक नवशिका जर का या IPL च्या सामन्यांमध्ये चमकला तर भारतीय संघासाठी खेळण्याचे दरवाजे त्याच्यासाठी उघडू शकतात. शुभमन गिल, रिंकू सिंग, ऋतुराज गायकवाड यांच्याबाबतीत तुम्ही हा अनुभव घेतलाच असेल. IPL हा फक्त खेळ नाही तर पैसे कमावण्याचं सर्वोत्तम साधन आहे, अनेक मोठाल्या कंपन्या आपल्या आवडत्या संघाची निवड करतात आणि त्यांच्या खर्चाची जबाबदारी उचलतात. बदल्यात मिळणाऱ्या नफ्यातून कंपन्यांनाच फायदा होत असतो. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे मुंबई इंडियन्स, हा रिलायन्स जियो कडून चालवला जाणारा संघ आहे. आता पुन्हा एकदा भारतात IPLची सुरुवात होईल आणि त्यानंतर अनेक चाहत्यांची उत्सुकता ताणली जाईल…

लवकरच होणार IPL Auction 2024:

IPLच्या खेळात देश विदेशातील खेळाडूंचा लिलाव केला जातो. अनेक खेळाडूंवर लाखो रुपयांपासून करोडो रुपयांची बोली लावली जाते. एकप्रकारे आपण याला खेळाडूंचा बाजार म्हणूयात. सर्वात जास्ती बोली लावलेल्या कंपनीकडे तो खेळाडू विकला जातो. सध्या ऑस्ट्रेलियामधले खेळाडू 2024च्या लिलावात सर्वाधिक टार्गेट केले जातील. विश्व चषक जिंकवून दिलेले खेळाडू म्हणजेच ट्रेव्हिस हेड, मिचेल स्टार्क, जोस इंग्लीस आणि स्वतः कर्णधार पॅट कमिन्स यांचावर बोली लावण्यासाठी सर्व संघ उत्सुक आहेत.

आपल्या भारतीय संघाचा विचार केला तर शार्दूल ठाकूर, हर्षल पटेल आणि उमेश यादव यांच्यावर सर्वाधिक बोली लावली जाण्याची शक्यता आहे. या खेळाडूंची बेज प्राईस 2 कोटी रुपयांपासून सुरु होते. यांव्यतिरिक्त एकूण 333 खळाडूंची 77 रिकाम्या जागा भरण्यासाठी निवड केली जाणार आहे. यामध्ये 214 भारतीय खेळाडूंचा समावेश आहे तर बाकी 119 खेळाडू परदेशी आहेत. क्रिकेटच्या विश्वात होणार हा सर्वात मोठा लिलाव (IPL Auction 2024) 19 डिसेंबर रोजी दुबईमध्ये पार पडेल.

या खेळाडूंवर असतील विशेष नजरा :

ऑस्ट्रेलियाचे खेळाडू विश्व चषक जिंकल्यामुळे सर्वांची पसंत असणारच आहेत, यांशिवाय न्यूझीलेंडच्या राचीन रवींद्र वर सर्वांच्या नजरा रोखलेल्या जातील. राचीन रवींद्रने विश्व चषकात दमदार कामगिरी केली होती, त्यामुळे त्याची बेज प्राईज सध्या 50 लाख अशी ठरवण्यात आली आहे. साऊथ आफ्रिकामधून जेराल्ड कॉइतझी आणि व्हेंडर दुसेन कोणत्या संघाचा भाग बनतो हे पाहणं आकर्षक ठरेल. वनिंदूं हसरांगा या श्रीलंकन खेळाडूवर 1.5 कोटीची बेज प्राईस लावण्यात आली आहे आणि त्याच्या सोबत श्रीलंकेमधून दिलशान मधुशंका अनेक मालकांच्या यादीत नोंद केला गेलेला असू शकतो. भारतीय खेळाडूंमध्ये शिवम मावी, कमलेश नगरकोट्टी यांच्यावर 20 ते 30 लाख रुपयांपासून बोली (IPL Auction 2024) लावली जाणार आहे.