IPO Boom: गेल्या काही काळापासून आपल्या देशातील गुंतवणूकदारांना IPO मधून दमदार फायदा मिळतोय आणि यात काही दिग्गजांची नावं सुद्धा सामावलेली आहेत. अलीकडे गुंतवणुकीचे अनेक पर्याय बदलत आहेत आणि यात IPO हा महत्वाचा घटक म्हणावा लागेल. आज आम्ही तुम्हाला काही अश्या गुंतवणूकदारांबद्दल माहिती देणार आहोत ज्यांनी IPO मध्ये गुंतवणूक करून भरगोस कमाई केली आहे, कदाचित तुम्ही या हस्तींचे चाहते सुद्धा असू शकता.
१) ड्रोनआचार्या एरियल इनोव्हेशन्स (DroneAcharya Aerial Innovations): अमीर खान आणि रणबीर कपूर
बॉलीवूडचा बादशाह आमिर खान आणि रणबीर कपूर यांनी गुंतवणुकीत यशस्वी झेंडा रोवला. भारतातील पहिली ड्रोन क्षेत्रातील कंपनी ‘ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन्स’ नुकतीच लघु आणि मध्यम उद्योगांच्या शेअर बाजारात (SME) लिस्ट झाली. या कंपनीच्या IPOपूर्व गुंतवणुकीतून या दोन्ही कलाकारांनी मालामाल झाले आहेत. आमिर खान यांनी फक्त 25 लाख रुपयांत 46,600 शेअर्स खरेदी केले होते, जे आता कंपनीच्या एकूण भांडवलाच्या 0.26 टक्क्यांएवढे आहेत. तर रणबीर कपूर यांनी 20 लाख रुपयांत 37,200 शेअर्स घेतले होते, जे कंपनीच्या 0.21 टक्क्यांपर्यंत आहे. वाढत्या बाजारभावामुळे आमिर खानची गुंतवणूक आता तब्बल 72.62 लाख रुपयांवर पोहोचली असून रणबीर कपूरच्या वाट्याची किंमत 57.97 लाख रुपयांवर पोहोचली आहे.
२) आझाद इंजिनियरिंग (Azad Engineering) : सचिन तेंडुलकर
क्रिकेटचा देव आणि बादशहा सचिन तेंडुलकर याने आझाद इंजिनियरिंगमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आणि कंपनीची चांदी व्हायला सुरुवात झाली. मार्च 2023 मध्ये सचिन तेंडुलकरने IPO पूर्व फेरीमध्ये 114.10 च्या सरासरी दराने 4,38,120 शेयर्स खरेदी केले होते. मात्र आज या गुंतवणुकीचा आकडा तुम्हला माहिती आहे का?(IPO Boom) वर्ष 2023 मध्ये केलेली ती गुंतवणूक आज चक्क 12 पटीने वाढली आहे! होय, आणि नवीन आकडा 59.39 कोटी रुपयांवर जाऊन पोहोचला आहे.
३) नायका (Nykaa) : आलीया भट आणि कतरीना कैफ (IPO Boom)
बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्री आलिया भट्ट आणि कतरिना कैफ यांनी गुंतवणिकीच्या क्षेत्रातही कमाल दाखवली आहे. ‘नायका’ या नावाजलेल्या सौंदर्यप्रसाधन कंपनीमध्ये आलिया भट्टने जुलै 2020 मध्ये 4.95 कोटी रुपये गुंतवले होते आणि आता तिने या गुंतवणुकीवर 54 कोटी रुपयांचा फायदा कमावला आहे. मात्र फक्त आलियाच तर कतरिना कैफचाही असाच अनुभव दिसतो. 2018 मध्ये तिने नायकासोबत ‘Nayka-Katrina Kaif Beauty’ नावाच्या Joint Venture मध्ये 2.04 कोटी रुपये गुंतवले होते. कंपनी लिस्ट झाल्यानंतर ही रक्कम जवळजवळ 11 पटीने वाढली आणि ती 22 कोटी रुपयांवर पोहोचली.