IPO News Update: महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चा केली जाणाऱ्या सराफ किंवा ज्वेलर्सपैकी दुसऱ्या क्रमांकाची PNG ज्वेलर्स लवकरच IPO घेऊन येण्याच्या तयारीत आहे आणि यासाठी त्यांनी सेबीकडे DRHP सादर केले आहे. या IPO द्वारे कंपनी 10 रुपये दर्शनी मूल्याचे अकराशे कोटी रुपयांचे शेअर विक्रीसाठी आणण्याच्या विचारात आहे. या सदर IPO मधून उभारलेल्या रकमेचा उपयोग त्यांच्याकडून राज्यात 12 नवी दालने उघडण्यासाठी तसेच कंपनीची जुनी कर्जे फेडण्यासाठी केला जाईल आणि यानंतर बाकी राहिलेली उर्वरित रक्कम कंपनीच्या इतर उद्दिष्टांसाठी वापरली जाईल.
महाराष्ट्रातील सुपरिचित सराफ: (IPO News Update)
PNG ज्वेलर्स हे महाराष्ट्रात सर्वाधिक दुकाने असलेला ज्वेलर्स/सराफ आहे, आपल्यापैकी अनेकांनी हे नाव वर्तमानपत्र तसेच TV वर चालणाऱ्या कार्यक्रमांमध्ये नक्कीच पहिला आणि ऐकलं असेल. वर्ष 2021 ते 2023 या काळात कंपनीची महसूलवाढ भारतातील सर्वाधिक असल्याची चर्चा केली जाते. गेल्या वर्षाच्या शेवटी कंपनीच्या दालनांची संख्या 33 झाली, त्यापैकी 32 दालने महाराष्ट्रातील 18 शहरांमध्ये आणि काही दुकाने शेजारच्या राज्यात म्हणजेच गोव्यात आहेत(IPO News Update), तर एक दुकान थेट समुद्रा पार म्हणजेच अमेरिकेत आहे. या दुकानांचा एकूण रिटेल एरिया 95 हजार 855 चौरस फूट आहे. तुम्ही जर का PNG चे ग्राहक असाल तर ही संधी तुमच्यासाठी गुंतवणुकीची सुवर्णसंधी नक्कीच बनू शकते.