बिझनेसनामा ऑनलाईन । सध्या शेअर बाजार चांगलाच तेजीत आहे. अशावेळी पैसे कमवण्याची आणखी एक मोठी संधी गुतवणूकदारांना मिळणार आहे. याचे कारण म्हणजे या आठवड्यात ४ कंपन्यांचे IPO बाजारात दाखल होणार आहेत. आत्मज हेल्थकेअर, एचएमए ऍग्रो इंडस्ट्रीज, व्हीफिन सोल्युशन्स आणि एसेन स्पेशालिटी फिल्म्स असे सदर ४ कंपन्यांची नवे आहेत. आज आम्ही तुम्हाला या सर्व IPO च्या प्राईज बँडसहित सर्व डिटेल्सबाबत सांगणार आहोत. चला जाणून घेऊया –
१) आत्मज हेल्थकेअर (Atmaj Healthcare) –
मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल चालवणारी आत्मज हेल्थकेअर चा IPO 19 जून रोजी लाँच होणार असून 21 जून रोजी बंद होईल. हा IPO 30 जून रोजी NSE वर लिस्टेड होणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून 38.40 कोटी रुपये उभारण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. या IPO अंतर्गत कंपनी 64 लाख नवीन शेअर जारी करणार आहे. आत्मज हेल्थकेअरने या IPO साठी प्रति शेअर 60 रुपये प्राईज बँड किंमत निश्चित केली आहे. तसेच या IPO साठी लॉट साईज हा 2000 शेअर्सचा आहे. म्हणजेच या आयपीओच्या सब्सक्राइबशनसाठी तुमच्याकडे कमीत कमी 1,20,000 रुपये लागतील.
२) एचएमए ऍग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड (HMA AGRO INDUSTRIES LIMITED)–
एचएमए ऍग्रो इंडस्ट्रीज 20 जून रोजी आपला IPO बाजारात लाँच करणार असून २३ जूनला तो बंद होईल. कंपनीचे मुख्य उद्दिष्ट 480 कोटी रुपये उभारण्याचे आहे. एचएमए ऍग्रो इंडस्ट्रीज आपल्या IPO साठी प्रति शेअर 555- 585 रुपये प्राईज बँड निश्चित केला आहे. BSE आणि NSE वर या कंपनीचा IPO 4 जुलै रोजी लिस्टेड होणार आहे.
३) Vfin सोल्यूशन्स (Vfin Solutions) –
VFin सोल्युशन्स ही डिजिटल कर्ज आणि पुरवठा साखळी वित्त तंत्रज्ञान कंपनी आहे. VFin सोल्युशन्स 22 जून रोजी त्याचा IPO बाजारात लॉन्च करणार आहे. आणि 26 जून रोजी बंद होणार आहे. या IPO च्या माध्यमातून 46.73 कोटी रुपये उभारण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. कंपनीने आपल्या IPO साठी 82 रुपये प्राईज बँड निश्चित केली आहे.
४) एसेन स्पेशालिटी फिल्म्स (Essen Specialty Films)-
एसेन स्पेशालिटी फिल्म्स, ही एक प्लास्टिक उत्पादने बनवणारी कंपनी आहे. येत्या 23 जून रोजी ही कंपनी आपला IPO लाँच करणार असून 27 जून रोजी तो बंद होईल. या IPO च्या माध्यमातून 66 कोटी उभारण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. एसेन स्पेशालिटी फिल्म्स ने आपल्या IPO साठी 101-107 रुपये प्रति शेअर इतकी प्राईज बँड निश्चित केली आहे.