गुंतवणुकीची मोठी संधी!! आजपासून बाजारात आलाय ‘या’ कंपनीचा IPO

बिझनेसनामा ऑनलाईन । शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. डिजिटल टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस कंपनी AccelerateBS india कंपनीचा IPO आज म्हणजेच 6 जुलैला ओपन होणार आहे. हा एक SME IPO असून गुंतवणूकदार त्यामध्ये 11 जुलै पर्यंत इन्व्हेस्ट करू शकतील. श्रेणी श्रेयस प्रायव्हेट लिमिटेड हे या आयपीओचे लीड मॅनेजर असणार आहेत. त्याचबरोबर बिग शेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड आयपीओ हे रजिस्टार असतील. AccelerateBS india या कंपनीचे प्रमोटर केयूर दीपक कुमार शहा आणि कुणाल अरविंद शहा हे असणार आहे.

AccelerateBS india या कंपनीच्या आयपीओसाठी 90 रुपये प्रति शेअर प्राईज बँड लावण्यात आली आहे. त्याचबरोबर यामध्ये 6.32 लाख शेअर्स विकले जाणार आहेत. ज्यामुळे आयपीओची प्राईस 5.69 करोड पर्यंत जाईल. AccelerateBS india या कंपनीच्या आयपीओ ची लॉट साईज 1600 शेअर्स एवढी असून रिटेल गुंतवणूकदारांना कमीत कमी 144,000 रुपये गुंतवावे लागणार आहे. या कंपनीच्या आयपीओ साठी 1.70 करोड रुपयांपर्यंत 188,800 फ्रेश इक्विटी शेअर्स उपलब्ध करून देण्यात येणार असून 3.99 करोड रुपयांपर्यंत 443,200 शेअर्स ऑफर फॉर सेल असणार आहे.

AccelerateBS india या कंपनी च्या फ्रेश इशू मधून उभारलेला फंड लॉन्ग टर्म वर्किंग कॅपिटल सुविधांसाठी वापरण्यात येणार असून सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी देखील उपयोगात आणण्यात येणार आहे. या कंपनीने पन्नास टक्के हिस्सा रिटेल गुंतवणूकदारांसाठी आणि शेष हिस्सा 50% बाकीच्या गुंतवणूकदारांसाठी आरक्षित केलेला आहे. AccelerateBS india या कंपनीचे शेअर्स 19 जुलैला BSE SME प्लॅटफॉर्मवर लिस्ट होण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर आयपीओ नुसार ग्रे मार्केट प्रीमियम आज शून्य आहे. म्हणजेच AccelerateBS india या कंपनीचे शेअर्स मार्केटमध्ये कोणत्याही प्रीमियम किंवा तोट्यामध्ये ट्रेडिंग करत नाहीत.