बिझनेसनामा ऑनलाईन । IPO म्हणजेच Initial public offering मध्ये पैशाची गुंतवणूक करण्याची इच्छा असणाऱ्यांना मोठी आनंदाची बातमी आहे. येत्या आठवड्यात तब्बल 5 कंपन्यांचे IPO बाजारात येणार असून गुंतवणुकदारांनी फक्त पैसे तयार ठेवायचे आहेत. कॉस्मिक सीआरएफ लिमिटेड, अर्बन एन्व्हायरो वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड, सेल पॉइंट (इंडिया) लिमिटेड , बिझोटिक कमर्शियल लिमिटेड, आणि एचएमए अॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड असे या सर्व 5 कंपन्यांची नावे आहेत. चला आज आपण या सर्व 5 आयपीओ बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
1) कॉस्मिक सीआरएफ लिमिटेड (Cosmic CRF Limited)-
कॉस्मिक सीआरएफ लिमिटेडचा IPO 14 जून रोजी गुंतवणुकीसाठी खुला होईल आणि त्यात 16 जूनपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. या IPO मधून कंपनीला 60 कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. या IPO ची प्राइस बँड 314-330 रुपये प्रति शेयर निश्चित करण्यात आलं आहे. यामाध्यमातून 18.22 लाख इक्विटी शेअर्स विकले जातील.
2) बिझोटिक कमर्शियल लिमिटेड (Bizotik Commercial Limited)-
Bizotik Commercial Limited चा IPO 12 जूनपासून गुंतवणुकीसाठी सुरु होणार असून 15 जूनपर्यंत गुंतवणूकदारांना पैसे गुंतवता येणार आहे. या एक MME IPO असून यामधून 42.21 कोटी उभारण्याचे कंपनीचे ध्येय आहे. बिझोटिक कमर्शियल लिमिटेड च्या IPO ची प्राईस बँड किंमत 175 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
3) सेल पॉइंट (इंडिया) लिमिटेड (Sell Point India Ltd)-
सेल पॉइंट (इंडिया) लिमिटेडचा IPO 15 जूनपासून बाजारात खुला होणार असून गुंतवणूकदारांना 20 जूनपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. कंपनीने या IPO ची प्राइस बैंड 100 रुपये प्रति शेयर निश्चित केली आहे. या IPO द्वारे 50.34 कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट सेल पॉइंट (इंडिया) लिमिटेडने ठेवलं आहे.
4) अर्बन एन्व्हायरो वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड (Urban Enviro Waste Management Limited)-
अर्बन एन्व्हायरो वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेडचा IPO 12 जूनला मार्केटमध्ये सुरु होईल आणि 14 जूनपर्यंत त्यामध्ये गुंतवणूक करता येणार आहे. कंपनीने या IPO च्या माध्यमातून 11.42 कोटी रुपये उभारण्याचे ध्येय ठेवलं आहे. यातील प्रत्येक शेअरची प्राईस बंद 100 रुपये ठेवण्यात आली आहे आणि फेस वैल्यू 10 रुपये प्रति शेअर असणार आहे.
5) एचएमए एग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड (HMA Agro Industries Limited)
एचएमए ऍग्रो इंडस्ट्रीज लिमिटेडचा IPO 20 जूनपासून सुरु होणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून 480 कोटी रुपये उभारण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. एचएमए एग्रो इंडस्ट्रीज लिमिटेडच्या प्रत्येक शेअर्ससाठी 555- 585 रुपये प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे.