बिझनेसनामा ऑनलाईन । शेअर मार्केटमध्ये चढ-उतार सुरूच असतात. त्याचबरोबर बऱ्याच कंपन्या मार्केटमध्ये त्यांचे IPO खुले करतात. त्याच प्रकारे आता या आठवड्यात शेअर मार्केटमध्ये 4 कंपन्यांचे IPO सबस्क्रीप्शन साठी (IPO This Week) खुले करण्यात येणार आहे. यासोबतच शेअर मार्केटमध्ये 5 नवीन कंपन्या लिस्ट होणार आहेत.
Pyramid Technoplast- IPO This Week
पिरॅमिड बेस्ट मॉडेल प्रॉडक्ट मेकर पिरामिड टेक्नोप्लास्ट या कंपनीच्या IPO 18 ऑगस्टपासून 22 ऑगस्ट पर्यंत सुरू करण्यात येणार (IPO This Week) आहे. या IPO चा प्राईस ब्रँड 151 ते 166 रुपये प्रति शेअर एवढा आहे. या IPO साठी अँकर बुक 17 ऑगस्टला एका दिवसासाठी खुले करण्यात येणार असून या कंपनीने पब्लिक इशू च्या माध्यमातून 153.05 करोड रुपये प्रॉफिट कमावण्याची योजना बनवली आहे. यासोबतच कंपनी यामधून मिळणारी रक्कम काही कर्ज फेडण्यासाठी आणि वर्किंग कॅपिटलच्या फायनान्शियल गरजेसाठी वापरण्यात येणार आहे. या कंपनीच्या ऑफर फोर सेल मध्ये प्रमोटर क्रेडेंट फायनाशिअल कन्सल्टन्सी या कंपनीचे शेअर्स सहभागी आहे. हे शेअर्स 61.75 करोड रुपये एवढे असून यामध्ये 91.3 करोड रुपये फ्रेश इशू देण्यात आला आहे. कंपनीचे आयपीओ 22 ऑगस्ट पर्यंत सुरू ठेवण्यात येणार असले तरीही 15 ऑगस्टला आणि पारसी न्यू इयर 16 ऑगस्ट रोजी करन्सी मार्केट बंद राहणार आहे.
TVS Supply Change Solution-
टीव्हीएस सप्लाय चेंज सोल्युशन या कंपनीचा आयपीओ 14 ऑगस्टला बंद होणार (IPO This Week) आहे. हा टीव्हीएस मोबिलिटी ग्रुपचा हिस्सा असून हा IPO 880 करोड रुपये एवढा होता. मागच्या दोन दिवसांमध्ये 1.03 पट सबस्क्रीप्शन मिळाले आहे. गुंतवणूकदारांनी 2.51 कोटी आकाराच्या IPO मध्ये 2.58 कोटी शेअर्स खरेदी केले आहेत. या कंपनीने IPO साठी प्राइस ब्रँड 187 ते 197 रुपये प्रति शेअर एवढे ठेवले होते. शेअर अलॉटमेंट 21 ऑगस्टला अंतिम टप्प्यांमध्ये असेल. यासोबतच 28 ऑगस्ट ला लिस्टिंग होणारआहे.
Bondada Engineering Limited-
या आठवड्यात SME विभागातील तीन IPO उघडतील, (IPO This Week) तर SME प्लॅटफॉर्मवर तीन लिस्टिंग होणार आहेत. Bondada Engineering आणि क्रॉप लाइफ सायन्सचे IPO इशू 18 ऑगस्टला खुले करण्यात येणार असून 22 ऑगस्टला बंद होतील. या कंपनीच्या आयपीओचा प्राईस ब्रांड 75 रुपये प्रति इक्विटी शेअर्स एवढे असून दहा रुपये फेस व्हॅल्यू फिक्स करण्यात आली आहे. Bondada IPO मध्ये 42.72 करोड़ रुपयांच्या 56,96,000 इक्विटी शेअर्स मध्ये फ्रेश इशू सहभागी करण्यात आले आहे.
डायमंड आणि ज्वेलरी निर्माता शोरा डिझाईन या कंपनीचे इशू 17 ऑगस्टला सबस्क्राईब साठी खुले करण्यात येणार आहे. या कंपनीचे इशू 2 करोड रुपयांचे असून यामध्ये फक्त फ्रेश इशू सहभागी करण्यात येणार आहे. या फ्रेश इशूची किंमत 48 रुपये प्रति शेअर एवढे आहे. त्याचबरोबर या कंपनीचा IPO 21ऑगस्टला बंद करण्यात येणार आहे. यासोबतच शेल्टर फार्मा या कंपनीचे इशू 14 ऑगस्टला बंद करण्यात येणार असून मागच्या दोन दिवसांमध्ये या कंपनीने तीनपट पेक्षा जास्त सबस्क्रीप्शन मिळवले आहे.