IPO This Week : या आठवड्यात येतायंत 6 कंपन्यांचे IPO; प्राईज बँड सह संपूर्ण माहिती पहाच

बिझनेसनामा ऑनलाईन । IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी फक्त पैसा तयार ठेवायचा आहे. याचे कारण म्हणजे या आठवड्यात बाजारात 6 कंपन्यांचे (IPO This Week) आयपीओ लाँच होणार आहेत. यामध्ये ideaForge Technology, Cyient DLM, PKH Ventures, Pentagon Rubber Ltd, Global Pet Industries Ltd, Synoptics Technologies या कंपन्यांचा समावेश आहे. या सर्व आयपीओच्या प्राईझ बँड सहित संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेऊया.

1) आयडिया फोर्ज deaForge Technology –

आयडिया (IPO This Week) फोर्ज कंपनीचा IPO हा आज म्हणजेच 26 जून 2023 रोजी उघडला जाणार आहे आणि 29 जून रोजी बंद होईल. या IPO ची प्राइस बँड 639 ते 672 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. आयडिया फोर्जच्या आयपीओची साईज 56.7 कोटी एवढी असणार आहे.

2) सायइंट डीएलएम (Cyient DLM) :

Cyient DLM Limited चा आयपीओ हा 26 जूनला बाजारात खुला होणार असून 27 जून पासून ते 30 जून पर्यंत तुम्हाला यामध्ये गुंतवणूक करता येते. या आयपीओच्या माध्यमातून 592 कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे. त्यासाठी Cyient DLM Limited ने या आयपीओची प्राईझ बँड किंमत 250 ते 265 रुपये प्रति शेअर ठेवली आहे.

3) पीएच व्हेंचर्स PKH Ventures:

पीएच व्हेंचर्सचा आयपीओ (IPO This Week) 30 जून पासून बाजारात सुरु होणार आहे तर ४ जुलै पर्यंत तुम्हाला गुंतवणूक करता येऊ शकते. या आयपीवोच्या माध्यमातून 380 कोटी उभारण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. या IPO ची प्राइस बँड कंपनीने अजून जाहीर केलेली नाही.

4) पेंटागॉन रबर (Pentagon Rubber Ltd) –

पेंटागॉन रबर या कंपनीचा IPO बाजारात 26 जून रोजी उघडेल आणि 30 जून रोजी बंद होईल. म्हणजेच 30 जूनपर्यंत तुम्ही यामध्ये गुंतवणूक करु शकता. पेंटागॉन रबरच्या IPO ची साईज 16.17 कोटी रुपये असून यासाठी कंपनीने 65 ते 70 रुपये प्राईस ब्रँड ठेवला आहे.

5) ग्लोबल पेट इंडस्ट्रीज (Global Pet Industries Ltd) :

ग्लोबल पेट इंडस्ट्रीज या कंपनीचा IPO 29 जून पासून बाजारात खुला राहणार असून यामध्ये 3 जुलै पर्यंत गुंतवणूक करता येईल. या आयपीओच्या माध्यमातून एकूण 13 कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे. ग्लोबल पेट इंडस्ट्रीजने आपल्या IPO साठी प्राइस बॅंड ४९ रुपये ठेवली आहे.

6) सिनॉप्टिक्स टेक्नोलॉजीज (Synoptics Technologies) :

सिनॉप्टिक्स टेक्नोलॉजीज चा IPO हा 30 जून पासून बाजारात खुला होणार असून ५ जुलै पर्यंत या आयपीओमध्ये गुंतवणूक करता येऊ शकेल. या IPO मध्ये 1,480,000 शेअर्सचा नवीन इश्यू आणि 800,000 पर्यंत शेअर्सच्या विक्रीची ऑफर आहे. कंपनीने यासाठी 237 रुपये प्राईज बँड निश्चित केला आहे.