IPOs In 2024 : पैसा तयार ठेवा रे!! 2024 मध्ये बाजारात येणार ‘या’ कंपन्यांचे IPO

IPOs In 2024: देशभरातील गुंतवणूकदारांसाठी एक खुशखबर जाहीर झाली आहे. तुम्ही जर का शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यात इच्छुक असाल तर हि बातमी आज सविस्तर वाचाच. यंदाच्या वर्षात काही कंपन्या बाजारात IPO जाहीर करतील, आणि यामुळे गुंतवणूकदारांना बंपर कमाई करण्याची संधी मिळणार आहे. गेल्यावर्षी देखील IPOच्या मदतीने अनेकांनी नफा कमावला होता आणि यंदा पुन्हा भरगोस कमाई करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. IPO ची बाजारी परिस्थती समजून घेण्याआधी IPO म्हणजे नेमकं काय हे थोडक्यात जाणून घेऊया.

IPO म्हणजे Initial Public Offering, जेव्हा एखादी खाजगी कंपनी पहिल्यांदा स्टोकसचे शेअर्स गुंतवणूकदाराना विकते तेव्हा या प्रक्रियेला Initial Public Offering म्हणजेच IPO म्हणून ओळखलं जातं. थोडक्यात, या अंतर्गत कंपनीची खासगी मालकी सार्वजनिक केली जाते. अल्पावधीत भरपूर नफा मिळवण्यासाठी IPO तुम्हाला कमालीची मदत करू शकतो आणि दीर्घकाळात तुमची संपत्ती वाढविण्यात देखील IPOची मदत मिळते.

IPOची बाजारी परिस्थती कशी आहे? (IPOs In 2024)

गेल्या वर्षात मेनबोर्डचे एकूण 57 IPO बाजारात आले होते, ज्यांनी सुमारे 50 हजार कोटी रुपये उभारण्याची मदत केली होती. शिवाय SME प्लॅटफॉर्मवर देखील अनेक IPO विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले होते, ज्यातून गुंतवणूकदारांनी भरपूर नफा कमावला होता. गेल्यावर्षीच्या यशानंतर यंदा देखील IPO ची गाडी भरधाव वेगाने जाणार असल्याची शक्यता आहे.

यंदाच्या वर्षात अनेक दिग्गज कंपन्या त्यांचे IPO सादर करणार (IPOs In 2024) असून यांमध्ये औफिस स्पेस सॉल्यूशन्स लिमिटेड, यूनिकॉमर्स, आकाश, फिनटेक कंपनी फोनपे(Phonepe), हॉस्पिटॅलिटी स्टार्टअप ओयो(OYO), मेडटेक कंपनी फार्म ईझी, फूड डिलिव्हरी कंपनी स्विगी(Swiggy), पे यू ईंडिया आणि मोबिक्विक यांचा समावेश असणार आहे. विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या या कंपन्यांनी IPO सादर करण्यासाठी सेबीकडे आवश्यक कागदपत्रे सुपूर्त केली आहेत.

कंपन्या IPO का जाहीर करतात?

बाजारात IPO जाहीर करून कंपन्या निधी उभारत असतात. IPO जाहीर करून (IPOs In 2024) मिळवलेले पैसे त्यानंतर भांडवल क्षमतेचा विस्तार करणे, उत्पादन वैविध्य आणणे, नवीन क्षेत्रात प्रवेश करणे, महत्त्वपूर्ण संशोधन करणे, विकास उपक्रम राबवणे इत्यादी विविध व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी वापरला जातो.