Iran vs Pakistan : गरिबीच्या विळख्यात अडकलेल्या पाकिस्तान आणि इराण सध्या एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. अलीकडेच इराणने पाकिस्तानमधील बलुच दहशतवादी गट जैश अल-अदलच्या मुख्यालयावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी अचूक हल्ला चढवला होता, या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा पाकिस्तानची हवाई यंत्रणा देशाचे संरक्षण करण्यास असमर्थ असल्याचा पुरावा त्यांनी जगाला दिला. या हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे, मात्र तुम्ही कधी दोन्ही देशांमध्ये सर्वात कमकुवत अर्थव्यवस्था कोणची असेल याचा विचार केला आहे का?
सर्वात गरीब कोण, पाकिस्तान का इराण? (Iran vs Pakistan)
पाकिस्तान सध्या गरिबीचा सामना करतोय ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे. पाकिस्तान स्वतःची परिस्थिती सुधाराचा प्रयत्न जरी करत असला तरी त्या प्रयत्नांना काही यश मिळत नाहीये. आत्ताच्या घडीला पाकिस्तानची GDP 340.64 अब्ज डॉलर्स आहे, आणि जगभरात GDP च्या यादीत पाकिस्तान 46 व्या स्थानावर येऊन पोहोचला आहे. आणि आता दोन्ही देशांबद्दल बोलायचं झाल्यास इराणची अर्थव्यवस्था पाकिस्तानच्या तुलनेत बरीच मजबूत आहे. इराणची एकूण GDP 366.438 अब्ज डॉलर्स असून, जगभरातील यादीत ते पाकिस्तानच्या चार पाऊलं पुढे आहे, म्हणजेच इराण 42 व्या स्थानावर आहे.
सुरक्षेच्या बाबतीत कोण सर्वश्रेष्ठ?
पाकिस्तान आणि इराणमध्ये चालेल्या युद्धाशी पाकिस्तान दोन हात करत असला तरीही त्यांची आर्थिक परिस्थिती अजिबात ठीक नाही. कर्ज बाजारी झालेल्या पाकिस्तानची जनता दररोज महागाईच्या विळख्यात अडकत चालली आहे. अन्न- पाण्याचे वांदे असलेल्या या देशाने आता मात्र संरक्षण बजेटमध्ये वाढ केली असल्याने सध्या पाकिस्ताच्या संरक्षण खर्चात वार्षिक आधारावर 15.4 टक्के वाढ झालेली पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला इराणजवळ 555 कोटींचं संरक्षण बजेट आहे. मात्र इराणची लष्करी क्षमता पाकिस्तानपेक्षा कमी आहे (Iran vs Pakistan), Global Fire Power Index 2024 च्या अहवालात इराण 14 व्या तर पाकिस्तान 9 व्या स्थानावर पाहायला मिळतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इराणचे चलन रियाल पेक्षा पाकिस्तानचा रुपया खूप मजबूत आहे.