IRCON Share: भारत सरकार आपल्या अखत्यारीखाली असलेल्या अजून एका कंपनीतील शेअरला रामराम ठोक्याच्या मार्गावर आहे. भारत सरकारकडून या कंपनीमधली काही टक्के भागेदारी कायमची विकण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. सरकारने हिस्सा विकण्याची हि काही पहिलीच वेळ नाही, याआधी देखील भारत सरकारने अनेक कंपन्यांचा यशस्वी लिलाव केला होता. आता सध्या भारत सरकार भारतीय रेल्वेची कंपनी असलेल्या IRCON मधली 8 टक्के भागीदारी विकण्याच्या तयारीत आहे. हि भागेदारी विकून सरकारला किती फायदा होऊ शकतो हे जाणून घेऊया, कारण सरकारच्या म्हणण्याप्रमाणे हि भागीदारी विकण्याच्या केवळ उद्देश हा पैसे उभा करण्याचा आहे.
केंद्र सरकार विकणार एवढा हिस्सा:
ऑफर फॉर सेल म्हणजेच OFS च्या अंतर्गत केंद्र सरकार भारतीय रेल्वेची कंपनी असलेल्या इरकोनमधली 8 टक्के शेअर्स (IRCON Share) विकणार आहे. हि कंपनी अभियांत्रिकी आणि स्थापत्य याशिवाय इतर अनेक सेवा पुरवण्याचे काम करते. भारत सरकारकडे सध्या या कंपनीची 73.18 टक्के भागेदारी आहे, ज्यापैकी 8 टक्क्यांची विक्री करण्याची योजना सरकार आखत आहे. असे करण्यामागे सरकारचा असलेला एकमेव उद्देश पैश्यांची उभारणी करणे असा आहे, आणि जर का हि विक्री मनासारखी झाली तर सरकारला यातून 1200 कोटी रुपये मिळणार आहेत.
माध्यमांना स्टोक एक्स्चेंज कडून मिळालेल्या माहितीनुसार कंपनीच्या प्रत्येक शेअरची (IRCON Share) किंमत 154 रुपये अशी ठरवण्यात आली आहे. बुधवारी झालेल्या एका शेअरच्या विक्रीनुसार हि किंमत ठरवण्यात आली होती. आतासाठी 8 टक्के विकण्याची इच्छा ठेवलेले सरकार आधी 4 टक्क्यांची विक्री करेल आणि दिलेल्या ऑफरला चांगला प्रतिसाद मिळतोय अशी चिन्हे जर का दिसून आली तर राहिलेल्या 4 टक्क्यांची विक्री केली जाईल.
IRCON च्या शेअर्सची स्थिती काय? (IRCON Share)
काल म्हणजेच बुधवारी कंपनीच्या शेयर्समध्ये घट झालेली पाहायला मिळाली, हि घट केवळ एक टक्क्याची होती. काल बाजार बंद होताना कंपनीचा एका शेअरची (IRCON Share) किंमत 171.65 अशी होती. मात्र गेल्या तीन महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये 12.56 तर सहा महिन्यांमध्ये 97.87 टक्क्यांची वाढ झालेली पाहायला मिळाली होती. कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना या वर्षी एकूण 188 टक्क्यांचा परतावा दिला आहे, आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कंपनीच्या शेअरमध्ये 300 टक्क्यांची वाढ झाली आहे. सध्या कंपनीचे एकूण मार्केट कॅप 16,176.87 कोटी रुपये आहे.