IRFC Share Price : रेल्वेच्या ‘या’ शेअर्सने घेतलीय चांगलीच गती; गुंतवणूकदारांना झाला मोठा फायदा

बिझनेसनामा ऑनलाईन । IRFC म्हणजेच Indian Railway Finance Cooperation Ltd. मध्ये गेल्या दोन दिवसांत मोठा बदल पाहायला मिळाला. IRFC च्या शेअर्स मध्ये (IRFC Share Price) तेजीने वाढ झाली आहे. सोमवारी यांच्या स्टॉकचा भाव वाढून 19% वर पोहोचला होता. तर मंगळवारी देखील शर्यतीत अव्वल राहत IRFC च्या शेअर्सनी कमालीची कामगिरी करून दाखवली. मंगळवारी या शेअर्स मध्ये 13% वाढ झालेली पाहायला मिळाली. अश्या लागोपाठ दमदार कामगिरी नंतर IRFC जवळ मोठा रेकॉर्ड करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे.

मंगळवारी कसे होते IRFC चे शेअर्स : IRFC Share Price

सोमवरी आपले शेअर्स वाढवल्या नंतर मंगळवारी सुद्धा इंडिअन रेल्वेच्या या शेअर्सनं यश मिळवले आहे. IRFC चे शेअर्स मंगळवारी 69.61 रुपयांत BSE वर सुरु झाले. आणि बघता बघता ह्यात वाढ होत त्यांनी 75.72 रुपयांचा पल्ला गाठला. त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास या शेअर्सचा भाव 72.63 रुपये होता.

IRCT ची स्थिती कशी आहे?

IRFC ला वर्ष 2021 पासून शेअर बाजारात स्थान मिळालं. सुरुवातीच्या दोन वर्षात तिची शेअर प्रायीस 26 रुपयांच्या आसपास होती. या वर्षीच्या मार्च महिन्यापासून कंपनीच्या शेअर्स मध्ये सुधारणा व्हायला सुरुवात झाली. आत्ता IRFC चा मार्केट कॅप 90,000 करोड रुपयांच्या पुढे जात 95,000 च्या आसपास आला आहे. या कंपनीकडे 1 लाख करोड रुपयांचा मार्केट कॅप पार (IRFC Share Price) करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. IRFC सध्या कंटेनर कोर्पोरेशन ऑफ इंडिया आणि IRCTC पेक्षा जास्ती वेल्युअबल कंपनी बनली आहे. 80 हजार करोड पासून 90 हजार करोड पर्यंत पोहोचायला या कंपनीला केवळ एक दिवस पुरेसा ठरला . त्यामुळे आत्ता या साकारात्मक परिस्थितीचा फायदा घेत कंपनी पुढे चांगली वाटचाल करते की नाही हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.