मुकेश अंबानीची मुलगी देणार रतन टाटा यांना टक्कर; सुरु करणार हा बिझनेस

बिझनेसनामा ऑनलाईन । भारतात सर्वांत श्रीमंत बिझनेस मॅनच्या यादीत असलेले मुकेश अंबानी यांना सर्वजण ओळखतात. रिलायन्स कंपनीचे हेड असलेले मुकेश अंबानीसोबतच त्यांची मुलगी ईशा अंबानी देखील त्यांचा बिझनेस सांभाळते. ईशा अंबानी आता तिच्या वडिलांसारखी जगात फेमस होत आहे. त्याचबरोबर आता ती नवीन बिझनेस घेऊन थेट रतन टाटा यांना टक्कर द्यायला येत आहे. ईशा अंबानीने नुकतंच युनायटेड किंगडम येथील एका कंपनीची डील क्रॅक केली आहे. ही डील रतन टाटांच्या स्टारबक्सला मोठी टक्कर देऊ शकते.

ही डील प्रेट ए मैगर कंपनी ची असून रतन टाटाच्या स्टारबक्स कंपनीला यामुळे चांगली टक्कर मिळेल. युनायटेड किंगडम मध्ये कॉफी आणि सॅन्डविच चेन प्रेट मैगर ने मुकेश अंबानी यांच्या सोबतच पार्टनरशिप आणि कॉन्ट्रॅक्ट साइन केल्यानंतर काही आठवड्यापूर्वी, भारतात पहिले स्टोर ओपन करण्यात आले आहे. देशभरातील युवा वर्गात चहा आणि कॉफी शॉप बाबत मोठं आकर्षण आहे. हीच गोष्ट डोळ्यासमोर ठेऊन ईशा अंबानीच्या रिलायन्स रिटेल आणि रिलायन्स ब्रँड्सने भारतात प्रीट ए मॅनेजर स्टोअर्स सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे .

रिलायन्स रिटेलचे पहिले प्रेट अ मॅनेजर स्टोअर मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील मेकर मॅक्सिटी येथे सुरु करण्यात आलं आहे. रिलायन्स ब्रँड्सने भारतात एकूण 10 प्रीट अ मॅनेजर रेस्टॉरंट्स उघडण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली आहे, जी बहुतके बेंगळुरू आणि दिल्लीमध्ये असतील. रिलायन्स कंपनीने उचललेल्या या पाऊलामुळे रतन टाटा यांच्या नेतृत्वाखालील स्टारबक्स इंडियाला तगडी फाईट मिळेल.