बिझनेसनामा ऑनलाईन । गेल्या आठवड्यापासून इस्रायल आणि आणि हमास यांच्यात भीषण युद्ध सुरु आहे. (Israel-Hamas War). पाच दशकांतील सर्वात मोठ्या भीषण हल्ल्यानंतर आता इस्रायलने हमासच्या विरोधात युद्धाची घोषणा केली आहे. या युद्धाचा परिणाम केवळ त्या दोन प्रतिस्पर्धीमध्ये होणार नसून आजूबाजूच्या जगावरही दिसून येणार आहे. आपल्या भारताच्या बाजारातही या युद्धाचा काही प्रमाणात परिणाम दिसून आला होता. हे युद्ध नेमकं किती दिवसांपर्यंत चालेल याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही, आणि यामुळे इस्रायल मध्ये असलेल्या अनेक कंपन्या आपले ऑपरेशन्स हलवण्याच्या तयारीत आहेत.
का कंपन्या हलवू पाहतायत ऑपरेशन्स:
इस्रायल या देशात अनेक कंपन्यांची कार्यालये आहेत .इंटेल, माय्क्रोसोफ्ट आणि गुगल यांसारख्या मोठमोठ्या कंपन्यांचा यात समावेश होतो. या जागतिक दर्ज्याच्या कंपन्यांच्या कामकाजावर वाढत्या तणावाचा परिमाण झालेला जाणवत आहे. भारतीय कंपन्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर यांत TCS आणि विप्रो यांचा समावेश आहे. गुगल सारख्या दिग्गज कंपन्यांची इथे ग्लोबल केपेबिलीटी सेंटर(Global Capability Center) आणि रिसर्च डेव्हलपमेंट सेन्टर्स (Research Development Centers) आहेत. आणि अश्या या मोठाल्या कंपन्यांमध्ये 1 लाखापेक्षा जास्ती लोकं काम करतात.
इस्रायल- हमास युद्धामुळे या कंपन्या कुठे जातील? Israel-Hamas War
जर का हे युद्ध आणि काही दिवस वाढलं तर नक्कीच या कंपन्या आपली कार्यालये भारतात किंवा इतर देशांमध्ये हलवू शकतात.ज्या कंपन्यांसाठी इस्रायलमध्ये कंपनी असणे आवश्यक आहे त्या ते इस्रायल प्रमाणे वेळ असलेया जागेत आपल्या कंपन्या हलवतील. अश्या कंपन्या पश्चिम आशियातील देशांचा विचार करू शकतात. सध्या इस्रायल या देशाची परिस्थिती फारच बिकट आहे, हमासने केलेल्या आक्रमणाला ते चोख प्रतिउत्तर देत असले तरीही हजारो लोकं आपले जीव गमावत आहेत, तर कितेकजण बेपत्ता आहेत. अश्या भीषण परिस्थितीत कंपन्या नवीन जाग्यांच्या शोधात आहेत ज्याचा विशेष फायदा भारत आणि पूर्व युरोपला होऊ शकतो.