Israel-Hamas War : भारतीयांसाठी आनंदाची बातमी; इस्रायलमध्ये काम करण्याची संधी

Israel-Hamas War : काही दिवसांपासून जगात इस्रायल आणि हमास यांच्यात चाललेल्या युद्धाचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागले होते. आर्थिक दृष्ट्या विचार करायचं झालं तर कित्येक व्यवसाय ठप्प झाले, किती तरी कंपन्या बंद झाल्या, अनेक गुंतवणुका फसल्या. 7 ऑक्टोबर रोजी हमासने केलेल्या या हल्ल्यानंतर जगाचं चित्रच बदललं. मात्र आता समोर आलेली बातमी हि भारताच्या कामगारांच्या दृष्टीने आनंदाची असू शकते, कोणती आहे हि बातमी जी आपल्याला युद्धाच्या काळात आनंदी करू शकते जाणून घेऊया …

भारतीयांसाठी आनंदाची बातमी: Israel-Hamas War

हमासने इस्रायेलवर हल्ला केल्यानंतर (Israel-Hamas War) देशातील सुमारे 90 हजार पोलेस्टीनी कामगारांचे परवाने रद्द झाल्यामुळे आता भारतीय कामगारांना त्यांच्या जागी भरती करून घेण्याची मागणी इस्रायल बांधकाम उद्योगाने तेल अवीव सरकारला केली आहे. इस्रायेल कडून या दरम्यान समोर आलेली माहिती सांगते कि भारत आणि इस्रायल यांच्यात या संदर्भात बोलणी सुरु आहेत आणि इस्रायल सरकारच्या परवानगीची वाट पहिली जात आहे. इस्रायल देशाला भारताकडून किमान 50 हजार ते एक लाख कामगारांची अपेक्षा आहे.

कारण हल्याच्या आधीपासून इस्रायेल मध्ये बांधकामासाठी 25 टक्के कामगार येत असत, यामधले 10 टक्के कामगार हे गाझा पट्टीतून यायचे. आता परिस्थती पूर्वी सारखी राहिलेली नाही. या कामगारांना इस्रायलमध्ये येऊन काम करण्याची परवानगी नाही, आणि याच्याच परिणामी इस्रायेलमध्ये बांधकामासाठी कामगारांची कमी जाणवत आहे. मात्र भारत सरकार आपल्या रहिवाश्यांच्या बापतीत हा निर्णय घेईल कि नाही याब्ब्दल शंका आहे, कारण अजून इस्रायलमध्ये पूर्णपणे परिस्थती सुधारलेली नाही, भारतीय परराष्ट्र खात्याचे अजूनही मौन कायम आहे.