बिझनेसनामा ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेले युद्ध (Israel-Hamas War) अजून काही संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. तिथे असलेल्या बिकट परिस्थितीमुळे कित्येक नावाजलेल्या कंपन्या आपली कार्यालये हलवण्याच्या तयारीत आहेत. गुगल सारखी दिग्गज कंपनीदेखील काही दिवसांत भारतात आपले कार्यालय घेऊन येईल अश्या चर्चा सुरु आहेत. त्यातच आता आज समोर आलेल्या बातमीनुसार, नेस्ले कंपनीने आपला व्यवसाय इस्रायलमधून बंद केला आहे..
कंपनीने नेमकं काय म्हंटल : Israel-Hamas War
चोकोलेट ते कोल्ड ड्रिंक बनवण्यासाठी प्रसिद्ध असेलेली कंपनी म्हणजे नेस्ले. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या क्रूर युद्धामुळे नेस्लेने इस्रायलमधून आपला व्यवसाय तात्पुरता बंद केला आहे. कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे युद्धाच्या परिस्थतीत काहीच सुधारणा न झाल्यामुळे काही काळासाठी त्यांनी आपला व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इस्रायलवर झालेला आतंकवादी हल्ला (Israel-Hamas War) हा अचानक घडला असल्यामुळे कंपन्यांना अघटीत प्रकाराबद्दल विचार करण्यासाठी पुरेसा अवधी मिळालेला नाही.
युद्धाच्या वेळी आपल्या सर्व कर्मचारी वर्गाला सुरक्षित ठेवणे हि आमची पहिली जबाबदारी आहे असे कंपनीचे म्हणणे आहे. आणि म्हणूनच त्यांनी काही काळासाठी आपले उत्पादन स्थगित केले आहे. आवश्यक असलेली सगळीच खबरदारी ते घेत आहेत, मात्र आता व्यवसायवाढीबद्दल बोलणे त्यांच्यासाठी शक्य नाही. युद्ध सुरु होऊन 14 दिवस पूर्ण होऊन सुद्धा यात कोणतेही सकारात्मक बदल घडून येत नाही आहेत, आज पर्यंत युद्धाच्या परिणामी 4,000 लोकांनी आपले जीव गमावले आहेत. या परिस्थितीत आपले कर्मचारी सुरक्षित असणे नेस्लेसाठी महत्वाचे आहे व म्हणूनच त्यांनी व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.