बिझनेसनामा ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून जगात इस्रायल आणि हमास (Israel-Hamas War) यांच्यातील युद्धाचा वाईट परिणाम दिसून येत आहे. तिथे अनेक निष्पाप लोकं आपलं जीवन गमावत आहेतच पण या युद्धाचे अनेक परिणाम देखील आहेत, कितीतरी देश- विदेशातील व्यवसाय यामुळे ठप्प झाले आहेत. अनेक व्यावसायिक आपला व्यवसाय दुसऱ्या ठिकाणी हलवण्याच्या विचारात आहेत. पण या युद्धात हमासला नेमका पैसा मिळतो तरी कुठून? या युद्धाचा आवाका पाहता सहजासहजी होणारं हे युद्ध नाही मग हमासला आर्थिक मदत नेमकी कुठून मिळतेय हे जाणून घेऊया..
इस्रायल आणि हमास युद्ध (Israel-Hamas War):
इस्रायल आणि हमास यांच्यात 7 ऑक्टोबरपासून हे युद्ध सुरूच आहे, आणि नेमकं कितीकाळ ते चालेल याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. हल्लासुरु झाल्यापसून गाझापट्टीतील दहा लाखांपेक्षा जास्ती लोकांना जीवाचे रक्षण करण्यासाठी घर सोडून निघून जाण्याची वेळ आली आहे. या प्रदेशात सध्या वीज, पाणी आणि अन्नाचा भरपूर प्रमाणात तुटवडा सुरु झाला आहे.
हमासबद्दल थोडक्यात :
हमास हि पोलीस्टाइनची इस्लामी आतंकवादी संघटना आहे. या संघटनेची सुरुवात वर्ष 1987 मध्ये झाली होती आणि तेव्हा पासून ती इस्रायलला पोलीस्टाइनी भागातून हाकलण्याचा प्रयत्न करीत आहे. गाझा पट्टीतून काम करणाऱ्या हमासला इस्रायल हा देश म्हणून मान्य नाही. हमासला आर्थिक मदत देण्यामध्ये अनेक देशांचा सहभाग आहे, आणि इथे सर्वात पहिली इराण आणि तुर्कीस्थान या देशांचे नाव पाहायला मिळते, यानंतर सिरीयाचा देखील या युद्धामध्ये (Israel-Hamas War) हमासच्या पाठीशी भक्कम हात आहे. इराण कडून हमासला आर्थिक मदत तसेच लष्करी मदत केली जात आहे.
परदेशातून येणारा पोलीस्टिनी राष्ट्रीय प्राधिकरणाद्वारे हमासला पैश्यांची मदत मिळते. याव्यतिरिक्त कारच्या माध्यमातून हमासला सुमारे 100 कोटी रुपये मिळतात. समोरआलेली बातमी सांगते कि हमासने क्रिप्टोकरन्सीचा वापर करून निधी गोळा केल आहे, हि माहिती इस्रायलला मिळताच त्यांनी हमासची हि खाती जप्त केली आहेत.