Israel War :इस्रायल आणि हमास यांच्यात चाललेल्या युद्धामुळे अनेक निर्दोष आणि निष्पाप लोकं आपले प्राण गमावत आहेत. अनेक लोकांचे जीव दर दिवसाला खर्ची पडत आहेतच, पण या व्यतिरिक्त सुद्धा युद्धाचे अनेक भीषण परिणाम आहेत ज्यांतीलच एक म्हणजे आर्थिक व्यवस्थेवर होणारा वाईट परिणाम होय. केवळ इस्रायलची परिस्थिती यामुळे बिघडणार नसून इस्रायल देशासोबत गुंतवणूक करणाऱ्या अनेक देशांवर याचा परिमाण दिसून येऊ शकतो. भारत यांपैक एक देश आहे. इस्राइल आणि पॅलेस्टाईन युद्धामुळे भारतीय शेअर बाजार गडगडला असून गुंतवणूकदारांचे 4 लाख कोटी रुपयांचे नुकसान झालं आहे.
इस्रायल- हमास युद्धामुळे Share Market स्थिती कशी आहे? (Israel War)
कालच्या व्यवहारात बाजारातील सर्वच क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झालेली पाहायला मिळाली. बँकिंग (Banking), कॅन्ज्युमर ड्युरेबल (Consumer Durable), ओईल एंड गेस (Oil and Gas), IT, मिडिया (Media) इत्यादी अनेक क्षेत्रांमध्ये घसरण झाली. तसेच त्यांच्या मिड कॅप आणि स्मॉल कॅपमधेही मोठी घसरण दिसून आली होती. निफ्टी मिड कॅप 1.34 टक्क्यांच्या घसरणीसह 39,744 रुपयांवर बंद झाला तर स्मॉल कॅप 1.78 टक्क्यांच्या घसरणीमुळे 12,609 रुपयांवर बंद झाला. आजच्या व्यवहारात सेन्सेक्समधील 30 शेअर्समधील 27 शेअर्समध्ये घसरण झाली तर फक्त 3 शेअर्सची स्थती चांगली राहिली. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी केवळ 7 शेअर्समध्ये वाढ झाली तर बाकी राहिलेल्या 43 शेअर्समध्ये घसरण झाली.
सेन्सेक्सच्या शेअर्सची परिस्थती:
सेन्सेक्सच्या 30 शेअर्स पैकी केवळ 3 शेअर्सनि सकारात्मक वाढ दाखवली ज्यांच्यामध्ये HCL टेकच्या (HCL Tech) शेअर्सचा समावेश आहे, या कंपनीच्या शेअर्सनी पूर्ण दिवसांत सर्वाधिक वाढ केले असून हा आकडा 1.02 आहे, यानंतर TCS आणि हिंदुस्तान युनिलीवरच्या शेअर्समध्ये 0.36 आणि 0.32 टक्क्यांची वाढ झाली. मात्र सेन्सेक्सवर शेअर्समध्ये घसरण होण्याचा आकडा आज फारच मोठा होता. तब्बल 27 कंपन्यांच्या शेअर्समध्ये भरपूर मोठी घसरण झाली, यात टाटा स्टीलच्या(Tata Steel) शेअर्समध्ये सगळ्यात जास्ती घसरण झाली, कंपनीचे शेअर्स 2.07 टक्क्यांनी घसरले. याशिवाय महिंद्रा एंड महिंद्रा, बजाज फायनान्स, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एशियन पेंट्स यांच्या शेअर्समध्येसुद्धा घसरण पाहायला मिळाली.
बाजारातील गुंतवणूकदरांचे नुकसान:
BSE वर नाव असलेल्या कंपन्यांना कालचा दिवस काही खास कमाई करणारा नव्हता तर उलट त्यांना मोठे नुकसानच सोसावे लागले. म्हणजेच 9 ऑक्टोबर रोजी कंपन्यांचे बाजरी भांडवल 315.94 लाख रुपयांनी घसरले. म्हणजेच या कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 3.92 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे, किंवा गुंतवणूकदारांना 3.92 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.