Israel-Hamas War : इस्रायलच्या गंभीर परिस्थितीचा भारतावर परिणाम? भारत-इस्रायलमध्ये 6 लाख कोटींची गुंतवणूक

Israel-Hamas War: इस्रायल आणि आणि हमास या पॉलेस्टीनी दहशदवादी संघटनेमध्ये सध्या युद्ध सुरु आहे. हमासने इस्रायलच्या अनेक ठिकाणांवर बॉम हल्ला केल्यामुळे अनेक निष्पाप लोकांनी आपले जीव गमावले आहेत. या बॉम्ब हल्ल्यांनवर इस्रायलने हमासला चांगलेच प्रतिउत्तर दिले. गाझा आणि दक्षिण इस्रायलमध्ये सुरु असलेल्या या लढाईत आत्तापर्यंत लाखो लोकांनी प्राण गमावले आहेत, या बरोबरच अनेक इमारती उधवस्त होत चहुबाजूनी देशाची हानी झाली आहे. भारत आणि इस्रायल यांच्यात व्यावसायिक संबंध चांगले आहेत, देशातील मोठे उद्योगपती गौतम अदानी यांनी तिथे मोठी गुंतवणूक केली आहे, आता सुरु असलेल्या परिस्थितीचा अदानीच्या व्यवसायावर काय परिमाण होतो हे पाहावं लागेल..

भारत-इस्रायलमध्ये 6 लाख कोटींची गुंतवणूक- Israel-Hamas War

इस्रायल या देशात भारतातील अनेक लोकं राहतात. तसेच दोन्ही देशांमधील व्यावसायिक संबंध सुद्धा चांगले आहेत. याआधी दोन्ही देशांमधील व्यापार हा 5 अब्ज डॉलर्सचा होता ज्यात वाढ होऊन आता तो 7.5 अब्ज डॉलर्स झाला आहे. याची भारतीय रुपयांमध्ये किंमत पाहायला गेल्यास ती 6 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. भारत आणि इस्रायल हे देश बंदरे (Port) आणि शिपिंग (Shipping) सोबत आणखीन अनेक क्षेत्रांमध्ये व्यवसाय करतात.

भारत आणि इस्रायलमध्ये हिऱ्यांचा व्यवसाय जोमाने चालतो. बंदर आणि शिपिंग नंतर याला आपण एक मोठा व्यवसाय म्हणू शकतो. BBCच्या रिपोर्टनुसार 1990 पर्यंत 200 मिलियन डॉलर्सचा असलेला हा व्यापार आता काही अब्ज डॉलर्स पर्यंत येऊन पोहोचलेला आहे .

इस्रायलमध्ये गौतम अदानी यांची गुंतवणूक:Israel-Hamas War

इस्रायलमध्ये गुंतवणूक करणाऱ्या अनेक भारतीयांपैकी एक आहे गौतम अदानी. गेल्याच वर्षी अदानी पोर्ट(Adani Ports)कडून इस्रायलसोबत 1.8 अब्ज डॉलर्सचा करार करण्यात आला होता. हि बोलणी अदानी आणि इस्रायलमधील कंपनी गेटोडा ग्रुप्स यांच्यात झाली, हैफा बंदराच्या खासगीकरणाबद्दल हि चर्चा होती. हे बंदर इस्रायलमधले सर्वात मोठे बंदर मानले जाते आणि गौतम अदानी यांच्याजवळ संधर्भातील 70% हिस्सेदारी असल्याची बातमी समोर आली आहे, त्यामुळे अदानी यांची या देशात बरीच मोठी गुंतवणूक आहे. सध्या इस्रायलमध्ये चालेल्या परिस्थितीचा (Israel-Hamas War) वाईट परिमाण देशाच्या आर्थिक परिस्थितीवर नकीच होऊ शकतो, मात्र त्यामुळे भारतीय गुंतवणूकदरांची स्थिती कशी असेल याचा आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागेल.