बिझनेसनामा ऑनलाईन । वाढत्या बेरोजगारीचे प्रमाण वाढलं असून गेल्या काही दिवसांपासून जगभरातील अनेक नावाजलेल्या कंपन्यांनी आर्थिक धोका पाहून आपल्या कर्मचाऱ्यांना नारळ दिल्याचे आपण पाहिले आहे. अनेक IT कंपन्यांनी (IT Recession In India) आपल्या कामगारांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. कंपन्यांनी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले असून एप्रिल-जून 2023 मध्ये TCS, Infosys, Wipro, HCL Tech या टॉपच्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकर कपात करण्यात आल्याचे स्पष्ट झालं आहे.
आयटी क्षेत्रामध्ये आघाडीवर असलेल्या टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल टेल या महत्त्वाच्या आयटी कंपन्यांमधील एकूण 17,335 कर्मचाऱ्यांची कपात (IT Recession In India) केली आहे. याउलट मागच्या वर्षी या आयटी कंपन्यांनी 52,842 कर्मचाऱ्यांना काम दिले होते. आणि कंपनीतील कामगारांची संख्या वाढवली होती.
Infosysकडून 6940 कर्मचाऱ्यांची कपात-
देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपनी (IT Recession In India) मधील एक असलेली इन्फोसिस या कंपनीने जून महिन्यामध्ये 6940 कर्मचाऱ्यांची कपात केली होती. यापूर्वी मार्च महिन्याच्या तिमाही मध्ये 3,611 कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली होती. आता इन्फोसिस मध्ये कर्मचाऱ्यांची संख्या 3,36,294 एवढी आहे. त्याचबरोबर एट्रीशन रेट म्हणजेच कर्मचाऱ्यांनी स्वतःहून नोकरी सोडल्याचा रेट मार्च मध्ये 20.9% एवढा होता तर जून महिन्यामध्ये 17.3% एवढा आहे.
विप्रो मध्ये 8812 कर्मचाऱ्यांना नारळ- (IT Recession In India)
दुसरीकडे, विप्रो मध्ये 8812 कर्मचारी कमी करण्यात आला आहे. त्याचबरोबर आता या कंपनीची कर्मचारी संख्या 2,49758 एवढी आहे. एट्रीशन रेटनुसार विप्रो या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी स्वतःहून नोकरी सोडल्याचा रेट 19.4% होता. हा रेट आता 17.3% वर आला आहे. विप्रो नंतर आता एचसीएल टेक या कंपनीमधील कर्मचाऱ्यांची संख्या (IT Recession In India) 2506 इतकी कमी झाली आहे. आता या कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या ही 2,23438 एवढी आहे. एट्रीशन रेटनुसार विप्रो या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी स्वतःहून नोकरी सोडल्याचा रेट 19.5% होता. हा रेट आता 16.3% वर आला आहे.
देशातील सर्वात मोठी IT कंपनीतील टीसीएस या कंपनीने मात्र आपल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत यावर्षी घट न करता वाढवली आहे. मार्च महिन्यात या कंपनीने 821 कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली होती. तर जून महिन्यामध्ये या कंपनीने कर्मचाऱ्यांची संख्या 523 ने वाढवली. सध्या टीसीएस या कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या 6,15,318 एवढी आहे. त्याचबरोबर एट्रीशन रेट मार्च महिन्याच्या तीमाहीत 20.1 टक्के तर जून महिन्याच्या तिमाहीत 17.8% होता.
टीसीएस येत्या काही महिन्यांमध्ये 40000 पेक्षा जास्त जॉब्स मिळवून देणार आहे. त्याच प्रकारे इन्फोसिस या कंपनीच्या म्हणण्यानुसार गरज पडेल तेव्हा याबद्दल विचार केला जाईल. टीसीएस कंपनीने जरी त्यांच्या कंपन्यातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली नसेल तरीही स्टाफ भरती मध्ये आयटी क्षेत्रामध्ये मंदी आल्याचं दिसून येत आहे.