IT Sector : हे आर्थिक वर्ष IT क्षेत्राला टेन्शन देणार; अमेरिकेकडून येणारी मागणी बंद

बिझनेसनामा ऑनलाईन । तुम्ही IT सेक्टरमध्ये काम करत आहात का? कदाचित हि बातमी वाचून तुम्हाला थोडं टेन्शन येऊ शकत. कारण या आर्थिक वर्षात या क्षेत्रात (IT Sector) वावरणाऱ्या लोकांसाठी काही दिवस कष्टाचे जाऊ शकतात. भारतातील IT क्षेत्राला हे आर्थिक वर्ष हलाखीचं जाणार आहे असा सल्ला जे पी मॉर्गनच्या विश्लेषकांनी दिला आहे. त्यामुळे या वर्षावर लक्ष केंद्रित न करता पुढच्या आर्थिक वर्षावर म्हणजेच वर्ष 2025 वर पूर्ण लक्ष्य केंद्रित करावं असा सल्ला त्यांनी दिला आहे. भारत हे विकसित राष्ट्र असल्यामुळे IT क्षेत्र हा आपला महत्वाचा भाग आहे, आणि इथेच परिस्थिती बिकट झाल्यामुळे याचा वाईट परिणाम पूर्ण देशावर होऊ शकतो.

काय दिलाय विश्लेषकांनी सल्ला:

गुंतवणूकदारांसाठी विश्लेषकांनी आगामी दुसऱ्या तिमाहीतील IT कंपन्यांच्या प्रदर्शनावर लक्ष द्यायचा सल्ला दिला आहे. त्या परिस्थितीला अनुसरून ते नेमकं कसं वक्तव्य करतात याकडे लक्ष द्या आणि सर्व गोष्टीचं विश्लेषण करून पहा. गेल्या काही महिन्यांपासून IT क्षेत्राला हवी तशी मागणी मिळालेली नाही. गेल्या तीन महिन्यात या क्षेत्रात काहीच सकारात्मक बदल जाणवले नाहीत. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत या क्षेत्रात (IT Sector) बदल होतील कि नाही याबाबत मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

अमेरीकेकडून IT Sector ला प्रोत्साहन नाही:

TCS, Wipro, HCL या भारतातील काही नावाजलेल्या IT कंपन्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या कंपन्यांना अमेरिकेकडून मिळालेली मागणी कमी झाली आहे. अमेरिकेतील बहुतांश लोकं आपला IT वरील खर्च कमी करत असल्यामुळे कित्येक पेमेन्टस (Payments) मध्ये भरपूर वेळ जात आहे, तर अनेकांकडून आपल्या मागण्या मागे घेतल्या जात आहेत. या परिस्थितीची माहिती असल्यामुळे गुंतवणूकदारांनी 2024 हे वर्ष धोक्याचं आहे हे समजून घेत या वर्षावरून नजर हटवत आता सगळं लक्ष आर्थिक वर्ष 2025 वर केंद्रित करण्याचा विचार केला आहे. येणाऱ्या आर्थिक वर्षात लार्ज कॅप IT कंपन्यांची एक अंकी वाढ होण्याची शक्यता आहे, तर बाकी बाजारात दोन अंकी वाढ होऊ शकते असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला.