IT Sector Jobs : आपल्या देशात अधिकाधिक रोजगार देणाऱ्या क्षेत्रांपैकी एक म्हणून IT क्षेत्राकडे बघितलं जातं. Wipro, Infosys, Tata Consultancy Services या देशातील काही प्रसिद्ध IT कंपन्या आहेत. असं म्हणतात की देशभरातील नोकरदार वर्गाला IT कंपन्यांमध्ये सर्वाधिक नोकऱ्या दिल्या जातात. तसेच विविध कॉलेजेस मधून इंजिनिअरिंगची पदवी मिळवल्यानंतर अनेक तरुण IT क्षेत्रात पदार्पण करतात. मात्र आत्ताच्या घडीला IT कंपन्या मधून नोकऱ्या देण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
IT कंपन्यांमध्ये नोकरी देण्याचे प्रमाण कमी: (IT Sector Jobs)
TCS, Infosys, Wipro आणि HCL Technologies या आपल्या भारत देशातील सर्वात नामांकित आणि दर्जेदार IT कंपन्या आहेत. जानेवारी महिन्यात या चारही कंपन्यांनी त्यांच्या तिमाहीचा निकाल जाहीर केला होता. शेअर बाजाराला त्यांनी दिलेल्या माहितीनुसार IT कंपन्यांच्या तिमाही निकालातून त्यांनी कमावलेल्या नफ्यात घसरण झालेली पाहायला मिळाली. बाजारी तज्ञांच्या मते Infosys सारखी दर्जेदार कंपनी मनासारखा नफा कमवू शकलेली नाही, म्हणूनच शेअर बाजाराच्या अपेक्षांचा भंग झाला आहे.
सदर कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या नोकऱ्यांमध्ये 50 हजार पेक्षा जास्ती मोठी घसरण झालेली आहे. सर्वात चिंतेची बाब म्हणजे बड्या IT कंपन्यांच्या headcount मध्ये एवढी मोठी घट अवघ्या एका वर्षाच्या कालावधीत दिसून आली आहे. या टॉप-4 कंपन्यांचा स्वतंत्रपणे विचार केला तर, गेल्या वर्षभरात 3 कंपन्यांचा headcount कमी झाली आहे तर केवळ एकाच कंपनीची संख्या किरकोळ वाढली आहे.
नोकऱ्यांबद्दल काय सांगतो तिमाहीचा निकाल?
समोर आलेल्या आकड्यांनुसार संपूर्ण वर्षभरात देशातील TCS या सर्वात मोठ्या आयटी कंपनीच्या headcount मध्ये 10,669 एवढी मोठी घसरण झाली होती. या कालावधीत Infosys मध्ये काम करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक 24,182 इतकी कमी झाली आहे. Wipro च्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 18,510 ने कमी झाली, तर दुसरीकडे HCL प्रमुखांची संख्या 2,486 ने वाढली आहे. याचाच अर्थ असा की देशभरातील चारही मोठाल्या IT कंपन्यांमध्ये केवळ एकाच कंपनीच्या आकड्यांमध्ये सकारात्मक वाढ झालेली पाहायला मिळाली(IT Sector Jobs).
या सर्व कंपन्यांच्या तिमाही निकालानुसार येणाऱ्या काळात देखील त्यांच्याकडून अधिकाधिक नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता वाटत नाही. Infosys च्या म्हणण्यानुसार त्यांना आताच्या घडीला नवीन कर्मचाऱ्यांची गरज नाही, मात्र TCS ने Campus Placement सुरू झाल्याची बातमी जाहीर केली आहे. बाजारातील IT कंपन्यांचा संपूर्ण तिमाहीचा निकाल पाहिला तर केवळ HCL या कंपनीने 4000 फ्रेशर्सना नोकरी दिली आहे.