ITR Filing Record : देशातील जनतेने केलाय नवीन रेकॉर्ड; यंदा ITR भरणाऱ्यांनी केला 8 कोटींचा आकडा पार

ITR Filing Record: इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच ITR. ज्यांची मिळकत 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे त्यांना सरकारला इन्कम टॅक्स भरावा लागतो. आणि आपल्याकडून कमावलेल्या पैश्यांची काही भरलेल्या कराची माहिती सरकारकडे पोहोचवणं म्हणजेच इन्कम टेक्स रिटर्न(ITR). याला मराठीमध्ये आयकर विवरणपत्र असे म्हणतात.भारत सरकारकडून यंदाच्या वर्षी इन्कम टेक्स रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2023 अशी देण्यात आली होती.आणि आज समोर आलेल्या माहितीनुसार आपल्या देशात ITR च्या बाबतीत एक नवीन विक्रम घडला आहे. 14 डिसेंबर पर्यंत इन्कम टेक्स रिटर्न भरणाऱ्यांचा आकडा केवळ 6 कोटींवर होता जो की वाढून मुदतीच्या शेवटच्या दिवशी 8 कोटींवर येऊन पोहोचला आहे. देशातील लोकांच्या या सुजाणतेपणावर सरकार खुश आहे.

ITR ने देशात रचलाय नवीन विक्रम: (ITR Filing Record)

अर्थ मंत्रालयाचे आकडे सांगतात कि आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये ITR भरणाऱ्या नागरिकांची संख्या 8.18 कोटी वर पोहोचली असून यात 9 टक्यांची दमदार तेजी आलेली पाहायला मिळाली. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार या वर्षी एकूण 1.60 कोटी ऑडिट रिपोर्ट तयार करण्यात आले होते, आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत आपण यांदा चांगलीच प्रगती दर्शवली आहे कारण गेल्यावर्षी हाच आकडा केवळ 1.43 कोटी एवढाच होता. देशभरातील जनतेने दाखवलेल्या उत्स्फुर्त प्रदिसादामुळे आयकर विभाग आणि भारत सरकार अत्यंत खुश आहेत. आयकर विभागाच्या वृत्तानुसार गेल्यावर्षी ITR भरणाऱ्यांचा आकडा केवळ 7.51 कोटी एवढाच होता, आणि यंदाच्या वर्षी यात वाढ झालेली असून नवीन आकडा 8.18 कोटी रुपयांवर जाऊन पोहोचला आहे.

यंदा ITR भरण्याची प्रक्रिया होती सोपी:

अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पगार, व्याज, लाभांश, वैयक्तिक माहिती, टीडीएस (DTS), तोटा, मॅट क्रेडिट इत्यादी अनेक माहिती आधीच गोळा करण्यात आली होती. आणि बाकी वर्षांच्या तुलनेत यंदा ITR भरण्याची प्रक्रिया देखील खूपच सोपी, सोयीस्कर आणि जलद करवण्यात आली, परिणामी ITR भरणाऱ्यांना याचा खूप फायदा झाला आणि याचा साकारात्मक परिणाम ऑडिटमध्ये दिसून आला (ITR Filing Record). सरकारच्या म्हणण्यानुसार, ITR आणि इतर फॉर्म त्वरीत भरण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. सरकारने ईमेल, एसएमएस आणि इतर अनेक सर्जनशील मोहिमा सुरू केल्या होत्या, ज्यांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.