ITR Filling : घरबसल्या 15 मिनिटांत भरा ITR; फक्त ‘या’ स्टेप्स फॉलो करा

बिझनेसनामा ऑनलाईन । 2022-23 या आर्थिक वर्षासाठी इनकम टॅक्स रिटर्न (ITR Filling) म्हणजेच ITR भरण्याबाबत तुमच्या मनात चिंता लागली असेल, कारण सरकार कडून 31 जुलै ही आयटीआर साठी डेडलाईन देण्यात आली आहे. जर या तारखेपर्यंत तुम्ही तुमची ITR फाईल सबमिट केली नाही तर त्यानंतर तुम्हाला पेनल्टी बसेल, त्यामुळे लवकरात लवकर हे काम उरकून टाका. तुमचं काम सोप्प व्हावं म्हणून आज आम्ही तुम्हाला घरबसल्या 15 मिनिटाच्या आत ऑनलाइन पद्धतीने ITR कसा भरावा याबाबत माहिती देणार आहोत. ही पद्धत अतिशय सोप्पी आहे.

तुम्हाला इनकम टॅक्स रिटर्न (ITR Filling) भरण्यासाठी काही डॉक्युमेंट महत्त्वाची आहे. ITR भरण्यासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक अकाउंट नंबर, इन्व्हेस्टमेंट डिटेल्स आणि प्रूफ सर्टिफिकेट, फॉर्म नंबर 16, फॉर्म नंबर 26 AS हे कागदपत्रे लागतात. या सर्व डॉक्युमेंट मधून इनकम टॅक्ससाठी लागणारी माहिती मिळून जाते.

अशा पद्धतीने भरा ऑनलाईन इनकम टॅक्स रिटर्न– (ITR Filling)

1) सर्वप्रथम इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या अधिकृत www.incometaxindiaefilling.gov.in या वेबसाईटवर जावे लागते.

2) त्यानंतर पॅन कार्ड नंबर टाकून तुमचे नाव रजिस्टर करा.

3) तुम्ही कोणत्या श्रेणीतील करदाते आहेत आणि कोणत्या प्रकारचा ITR फॉर्म भरायचा आहे हे निवडावे लागेल.

4) जर तुमच्याकडे फॉर्म नंबर 16 असेल तर तुम्ही आयटीआर 1 किंवा आयटीआर 2 त्यापैकी एक ऑप्शन निवडू शकतात.

5) त्यानंतर तुम्ही ज्या वर्षाचा आयटी रिटर्न भरत आहात ते वर्ष टाका. ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म सबमिट करावा लागेल.

6) त्याचबरोबर इथे दिलेल्या अटॅच फाईल या ऑप्शन वर जाऊन फॉर्म जॉईन करावा लागेल.

इनकम टॅक्स रिटर्न हा 2 प्रकारे भरला जातो. एक म्हणजे ऑफलाइन पद्धतीने आणि दुसरा म्हणजे ऑनलाइन पद्धतीने. ऑफलाइन पद्धतीमध्ये हा फॉर्म डाउनलोड करावा लागतो. त्यानंतर XML फाईल अपलोड करावी लागते. त्याचबरोबर ऑनलाइन पद्धतीमध्ये ई- फायलिंग पोर्टलवर जाऊन संपूर्ण माहिती भरून सबमिट करावी लागते.