Jan Aushadhi Kendra : 5000 रुपयांत सुरु करा ‘हा’ व्यवसाय; स्वतः मोदी करतायंत प्रोमोशन

Jan Aushadhi Kendra | तुम्हाला इतरांच्या हाताखाली काम करायचं नाही आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे? पण नेमकी सुरुवात कशी करावी हे समजत नसेल तर पुढे नक्की वाचा. तुमच्याजवळ पुरेशी आर्थिक सोय नसल्यामुळे तुम्ही व्यवसाय सुरु करताना घाबरत असाल तर आता घाबरण्याची  गरज नाही.  सरकार तुमच्या व्यवसायाला वेळोवेळी मदत करत असते. देशाचे पंतप्रधान मोदी यांनी हल्लीच जन औषधी केंद्राची योजना सुरुवात केली आहे. हे केंद्र तुमच्या गावात/ शहरात सुरु करण्यासाठी सरकार तुम्हाला सर्व मदत देऊ करेल आणि याचा वापर करत तुम्ही स्वत: ह्या औषधी केंद्राचा व्यवसाय सुरु करू शकता.

काय आहे जन औषधी केंद्र? Jan Aushadhi Kendra

प्रधानमंत्री जन औषधी केंद्र ही मोहीम (Pradhanmantri janaaushadhi kendra) Department Of Pharmaceuticals In Association With Central Pharma Public Sector क्षेत्रानांतर्गत सुरु केली गेली आहे. आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या लोकासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. इथे कमी खर्चात तुम्हाला चांगल्यातली चांगली औषध मिळवून दिली जातील.

या औषधी केंद्राची सुरुवात कशी कराल?

देशात अधिकाधिक लोकांनी अश्या औषधी केंद्रांची (Jan Aushadhi Kendra) सुरुवात करावी अशी सरकारची मागणी आहे. केंद्र सरकारला विश्वास आहे की  2024 पर्यत भारतात अश्या केंद्रांची संख्या 10 हजार पर्यंत नक्कीच पोहोचेल. गरीब लोकाना चांगल्यातली चांगली औषध मिळावी म्हणून या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. बाजारात औषधांची किंमत फारच महाग असते जी सर्वांना परवडणारी नाही, अश्यावेळी  मागासलेल्या वर्गाला व्यवस्थित औषधाची  मदत पोहोचावी म्हणून ह्या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

काय आहे पात्रता ?

सरकार द्वारे ही औषधी केंद्र तीन विभांगामध्ये विभाजित केली गेली आहेत. ज्याच्या पहिल्या विभागात  Doctors, Medical Professionals,आणि Pharmacists यांचा समावेश आहे. या लोकांना औषधांबद्दल जास्तीत जास्त माहिती असल्यामुळे ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.  तर दुसर्या विभागात NGO, Trust आणि खासगी हॉस्पिटल्सचा समावेश आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या विभागात राज्य सरकार द्वारे मान्यताप्राप्त agencies सामील होतात . या व्यतिरिक्त ज्यांच्याजवळ B.PHARM किवा M. PHARM ची पदवी असेल त्यांना हा व्यवसाय सुरु करता येईल. यासाठी  तुमच्या जवळ Retail Drug Sale चे लाइसन्स असणे महत्वाचे आहे.

कसा करावा अर्ज ?

दिव्यांग , SC, ST वर्गासाठी पन्नास हजार रुपयांची औषध एडवांन्स मध्ये देऊ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने  घेतला आहे. ज्यांना हा व्यवसाय सुरु करायचा आहे त्यांनी (http://janaushadhi.gov.in/online_registration.aspx) अधिकृत साईटवर जाऊन form भरावा. ज्याची फी 5000 रुपये आहे. जन औषधी केंद्रे उघडण्यासाठी (Jan Aushadhi Kendra)अर्जदाराकडे डी. फार्मा किंवा बी. फार्मा प्रमाणपत्र आवश्यक आहे. याशिवाय, तुमच्याकडे केंद्र उघडण्यासाठी पुरेशी जागा असावी, ज्याचे क्षेत्रफळ सुमारे 120 चौरस फूट असले पाहिजेत.

अधिक माहितीसाठी वाचा – PDF