Japan Investment In India: जपानने भारताला 232 अब्ज येन (सुमारे 12,800 कोटी रुपये) कर्ज देण्याची मंजूरी दिली आहे. हे कर्ज भारतातील विविध क्षेत्रांतील 9 प्रकल्पांसाठी दिले जाईल अशी माहिती आज अर्थ मंत्रालयाने जाहीर केली. या कर्जाच्या करारावर आर्थिक व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव विकास शील आणि जपानचे भारतातील राजदूत सुझुकी हिरोशी यांनी स्वाक्षरी केली असल्याने अधिकृत रीतीने हा करार पूर्ण झाला आहे. भारत आणि जपान यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध 1958 पासून टिकून आहेत आणि या काळात दोन्ही देशांमधील सहकार्य अनेक क्षेत्रात वाढत आहे, यातील आर्थिक भागीदारी हा एक महत्त्वाचा स्तंभच म्हणावा लागेल.
भारतातील अनेक राज्यांसाठी नवीन विकास प्रकल्प: (Japan Investment In India)
जपानच्या मदतीने आज भारत सरकारने अनेक राज्यांसाठी नवीन विकास प्रकल्पांना मंजूरी दिली आहे. या प्रकल्पांमध्ये ईशान्य भारतातील रस्ते प्रकल्प, तेलंगणामध्ये स्टार्ट-अप आणि इनोव्हेशनला (Innovation) प्रोत्साहन देण्यासाठीचा प्रकल्प, चेन्नईमधील रिंग रोड प्रकल्प, हरियाणामध्ये शाश्वत फलोत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रकल्प आणि राजस्थानमध्ये हवामान बदल आणि परिसंस्था संवर्धन प्रकल्प यांचा समावेश होतो.
जापान कडून घेतलेल्या आर्थिक मदतीने नागालँडमध्ये वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालये विकसित करून सार्वजनिक आरोग्य क्षेत्र सुधारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तेलंगणातील प्रकल्पात महिलांना आणि ग्रामीण भागातील लोकांना उद्योजक कौशल्ये शिकण्यास मदत दिली जाईल आणि MSME व्यवसायांचा विस्तार करण्यास मदत होईल(Japan Investment In India). सर्वात शेवटी हे पैसे वापरून रेल्वेद्वारे मालवाहतूक वाढविण्यासाठी रेल्वे विकासालाही मदत केली जाणार आहे.