Jayanti Kathale: IT सोडून वारसा जपला!! महाराष्ट्राच्या चवीचा आणि संस्कृतीचा ठसा परदेशात उमटवला

Jayanti Kathale: महाराष्ट्राच्या पारंपरिक पदार्थांचं नेमकं चित्र जगाच्या पाठीवर उमटवण्याचं स्वप्न उराशी बाळगून प्रयत्नशील एका आईच्या जिद्दीची ही कहाणी आहे. एका बरीच मोठी कंपनी सोडून, आपल्या मातृत्वाच्या भावनेला आधार बनावत त्यांनी आपल्या स्वयंपाक कौशल्याला व्यावसायिक स्वरुप दिला. त्यांच्या हातून बनणाऱ्या पदार्थांमधून केवळ चवच नाही तर महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने झलक दिसते. अडथळ्यांना न जुमानता स्वप्नांना नवी उंची देणाऱ्या जयंती कठाळे यांची जीवनकहाणी प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरणादायक आहे.

कोण आहेत जयंती कठाळे?

अडचणींना सामोरं जात, आत्मविश्वास आणि धडाड्याने आपल्या मार्गावर ठाम राहणाऱ्या “पूर्णब्रम्ह” मराठमोळ्या रेस्टॉरंटच्या संस्थापिका (founder) भारतात आणि परदेशात 14 यशस्वी रेस्टॉरंट्स चालवल्या आहेत. त्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाने ऑथेन्टिक मराठमोळ्या स्वादाची जादू त्यांनी जगभरात पसरवली आहे.

Jayanti Kathale जन्म आणि शिक्षण:

नागपूरच्या जयंती कठाळे यांनी आपल्या कठोर परिश्रमाच्या बळावर यशस्वी कारकीर्दीची उंची शिखरे सर केली आहेत. त्यांनी MCA पदवी पूर्ण केल्यानंतर Software Engineer म्हणून काम केले. पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी बेंगलोरच्या प्रसिद्ध Infosys मध्ये Project Manager म्हणून जबाबदारी पार पडली. त्यांचे पती प्रणव कठाळे हे Wipro मध्ये कार्यरत आहेत आणि त्यांना दोन मुले आहेत.

पूर्णब्रम्ह सुरुवात कशी झाली?

महाराष्ट्राच्या पाककृतीचा खरा खजिना फार मोठा आहे आणि तो अजूनही अनेकांना ज्ञात नाहीये. याच भावनेतून एका महाराष्ट्रातील महिलांने स्वतः पुढाकार घेऊन लोकांना आपल्या राज्याच्या विविध चवींची ओळख करून देण्याचं ठरवलं, शिवाय परदेशात आलेल्या एका कटू अनुभवाने जयंती कठाळे(Jayanti Kathale) यांना स्वतःची खानावळ सुरु करण्यासाठी भाग पडलं(प्रेरणा दिली).

पुढे तीन वर्ष अथक प्रयत्न करून पुर्णब्रम्हची सुरुवात झाली, आपल्याकडे अन्नाला पूर्णब्रम्ह म्हणतात आणि याचाच आधार घेऊन जयंती कठाळे यांनी खानावळीला नाव दिलं. त्यांची ही रेस्टोरंट्स आज केवळ देशातच नाहीतर विदेशात देखील मानाने महाराष्ट्राची चव पोहोचवतात, आणि या उपक्रमाची सुरुवात वर्ष 2012 मध्ये झाली होती. आज भलं मोठं यश संपादन केल्यानंतर जयंती कठाळे म्हणतात की त्यांचा मुलगा पार्थ आणि Infosys च्या सुधा मूर्ती यांच्याकडून त्यांना कार्यरत राहण्याची प्रेरणा मिळते.