बिझनेसनामा ऑनलाईन । भारतात सर्वांत श्रीमंत उद्योगपती म्हणून मुकेश अंबानी (Mukesh Ambani) ओळखले जातात. रिलायन्स कंपनीचे हेड असलेले मुकेश अंबानी जिओच्या माध्यमातून भारतातील मोबाईल टेलिफोन ब्रॉड ब्रांड व्यवसायावर राज्य करत आहे. रिलायन्स रिटेल च्या माध्यमातून त्यांनी देशातील किराणा व्यवसायात ठसा उमटवला आहे. यानंतर आता जिओ फायनान्शिअल सर्विसेस (JFSL Listing Date) या क्षेत्रासोबत मुकेश अंबानी यांचं नाव जोडलं जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. या घोषणेनंतर गुंतवणूकदार या कंपनीच्या लिस्टिंगची वाट पाहत होते. आता शेअर मार्केटमध्ये 21 ऑगस्टला ही कंपनी लिस्टिंग करण्यात येणार आहे.
शेअर धारकांच्या खात्यात जमा करण्यात आले शेअर्स
रिलायन्सच्या शेअर धारकांना मागच्या आठवड्यामध्ये जिओ फायनान्शिअल सर्विसेस चे शेअर RIL च्या एलिजिबल शेअर होल्डर्स च्या डीमॅट खात्यात जमा करण्यात आले होते. ज्या शेअर्स होल्डरकडे RIL चे शेअर होते त्यांना 1:1 याप्रमाणे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस चे शेअर देण्यात आले आहे.
एवढे होते या कंपनीचे बाजार मूल्य– (JFSL Listing Date)
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस (JFSL Listing Date) ही आता या क्षेत्रामधील भारताची पाचवी सर्वात मोठी कंपनी असेल. 20 जुलैला डी मर्जरचा रेकॉर्डनुसार आणि जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस च्या शेअर किमतीनुसार जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस JFSL चे बाजार मूल्य 21 अब्ज एवढे होते. जिओ फायनान्शिअल सर्विस च्या शेअर ची किंमत 261.85 रुपये प्रति शेअर एवढी होती. शेअरचे मूल्यांकन ब्रोकरेज हे 190 रुपयांच्या अंदाजाप्रमाणे जास्त होते. त्यानुसार NBFC च्या मार्केटचे कॅपिटलायझेशन 1.66 लाख करोड रुपयांपर्यंत आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या सध्याच्या शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर्स कडे कंपनीचे 45.80 टक्के हिस्सेदारी आहे. यासोबतच म्युच्युअल फंड जवळ कंपनीचे 6.27 टक्के आणि विदेशी संस्थांमध्ये 26.44% हिस्सेदारी आहे.
या निर्देशांकांमध्ये आहे ही कंपनी
जिओ फायनान्शिअल सर्विसेस ला निफ्टी 50, बीएसई सेन्सेक्स, यासारख्या इंडिसेस मध्ये सहभागी करण्यात आले होते. यानुसार ही कंपनी बाकीच्या निर्देशांकामध्ये देखील उपलब्ध आहे. कंपनीच्या लिस्टिंगपर्यंत या कंपनीच्या स्टॉकची किंमत एकसमान राहील. FTSL ऑल वर्ल्ड इंडेक्स, FTSL MPF ऑल वर्ल्ड इंडेक्स, FTSE ग्लोबल लार्ज कॅप इंडेक्स, FTSE इमर्जन्सी इंडेक्स 22 ऑगस्ट पासून जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस काढून टाकण्याची घोषणा करण्यात आली होती.