JFSL Listing : जिओ फायनान्शिअल सर्विसेसचे BSE वर 265 रुपयांवर लिस्टिंग

बिझनेसनामा ऑनलाईन । भारतात सर्वांत श्रीमंत उद्योगपती असलेल्या मुकेश अंबानी यांच्या Jio Financial Services Limited चे लिस्टिंग (JFSL Listing) आज करण्यात आलं आहे. रिलायन्स इंडस्ट्री मधून डीमर्ज झाल्यानंतर जिओ फायनान्शिअल सर्विसेस चे शेअर्स NSE वर 262 रुपये दराने लिस्ट झाले आहे. आणि BSE वर म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर हे शेअर 265 रुपयाच्या भावाने लिस्ट करण्यात आले आहे. 20 जुलैला या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस चे रेट हे 261.8 एवढे होते. जिओ फायनान्शियलचे 635 कोटी शेअर्स एक्सचेंजवर लिस्ट झाले होते. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसची मार्केट कॅप 1.66 लाख कोटी रुपये एवढी आहे. यानुसार रिलायन्स इंडस्ट्रीची जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ही कंपनी बजाज फायनान्स नंतर देशातील दुसरी सर्वात मोठी कंपनी असेल.

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसकडे या कंपन्यांचे होल्डिंग – (JFSL Listing)

रिलायन्सच्या या फायनान्शियल सर्व्हिस कंपनीच्या जवळ ब्रोकिंग, AMC, NBFC, इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंड चे लायसन्स आहे. यासोबतच Reliance industrial investment and Holdings, Reliance payment solutions, Reliance Retail Finance, jio payments Bank, jio information aggregator services, Reliance Retail insurance broking limited या सहा कंपन्यांचे होल्डिंग जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कडे आहे.

आज करण्यात आलेल्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या लिस्टिंग नंतर (JFSL Listing) आता दहा दिवसांपर्यंत शेअर ट्रेंड टू ट्रेंड मध्ये राहील.म्हणजे त्याचे शेअर्स केवळ डिलिव्हरीच्या आधारावर खरेदी आणि विक्री केले जातील. पुढील 10 ट्रेडिंग दिवसांमध्ये त्याच्या शेअर्समध्ये इंट्रा-डे ट्रेड होणार नाही.