Jio Affordable Plans : 75 रुपयांत महिनाभर कॉलिंगची मजा; Jio ने आणला परवडणार रिचार्ज प्लॅन

Jio Affordable Plans: जिओ धन-धना-धन म्हणत Jio कंपनी देशभरात दिवसेंदिवस आपला बोलबाला वाढवत आहे. प्रत्येकाच्या घरात Jio चं सिमकार्ड वापरणारी एक व्यक्ती तरी नक्कीच असेल. त्यामुळे सध्या भारतातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक म्हणून रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिलायन्स जिओ या कंपनीची ओळख केली जाते. आपला वाढता ग्राहक वर्ग लक्षात घेत त्यांना कंपनी विविध सोयी उपलब्ध करून देते, तसेच नवीन ग्राहकांना कंपनीसोबत जोडण्यासाठी Jio अधिकाधिक मेहनत घेत असते. सामान्य माणसांना परवडेल अशा स्वस्त दरात कंपनी काही मोबाईल रिचार्ज बाजारात आणत असते. आज देखील आम्ही घेऊन आलेली ही बातमी तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर ठरणार आहे. कारण अलीकडच्या जगात जिथे मोबाईल रिचार्ज अत्यंत महाग झालेले आहेत अशा परिस्थितीत तुमची सुटका करू शकणारा असा एक रिचार्ज प्लॅन जिओ खास तुमच्यासाठी घेऊन आला आहे.

हा आहे Jio चा सर्वात स्वस्त मिळणारा प्लॅन: (Jio Affordable Plans)

मोबाईलच्या ह्या जगात एकमेकांसोबत बोलल्याशिवाय आपला एकही दिवस पूर्ण होत नाही. मोबाईलचा रिचार्ज संपला तर एखाद दिवस सुद्धा आपलं जीवन मुश्किल होऊन जातं. आणि हीच परिस्थिती ओळखून आपल्या ग्राहकांच्या हितासाठी जिओने एक नवीन आणि स्वस्तात उपलब्ध होणारा प्लॅन बाजारात आणला आहे (Jio Affordable Plans). त्यामुळे जर का तुम्ही Jio चे युजर असाल तर हा प्लॅन तुमच्यासाठी खरोखरच फायदेशीर ठरणार आहे. केवळ 75 रुपयांत रुपयांत मिळणारा Jio चा हा प्लॅन नक्की कसा आहे हे जाणून घेऊया.

Jio चा 75 रुपयांचा नवीन प्लॅन:

Jio ने बाजारात आणलेला हा नवीन प्लॅन फक्त कॉलिंगसाठी सिम कार्डचा वापर करणाऱ्या ग्राहकांना भरपूर फायदे मिळवून देणार आहे. पण इंटरनेटसाठी जिओवर अवलंबून असलेल्या ग्राहकांनी त्वरित या प्लॅनकडून पाठ फिरवावी, कारण हा प्लॅन तुमच्यासाठी बनलेला नाही. जर का तुमच्या घरात WIFI सारखी सोय असेल तर मात्र जिओचा हा प्लॅन तुम्ही नक्कीच विकत घेऊ शकता. पण इंटरनेटसाठी एका सवलतीच्या प्लॅनच्या शोधात असणाऱ्या मंडळींसाठी हा प्लॅन पूर्णपणे अयोग्य ठरणार आहे. 75 रुपयांत मिळणारा हा प्लॅन 23 दिवसांसाठी वैध असतो, यामध्ये तुम्हाला दररोज 0.1MB डेटा आणि त्या व्यतिरिक्त 200 MB डेटा दिला जातो. कंपनीकडून ह्या प्लेनचा आराखडा केवळ कॉलिंगसाठी बनवण्यात आला आहे, पण यासोबतच 50 मोफत SMSचा लाभ देखील ग्राहक मिळवू शकतात.

कॉलिंगसाठी जर का तुम्हाला जास्त व्हॅलिडीटी असलेला एखादा प्लॅन हवा असेल तर तुम्ही 91 रुपयांचा रिचार्ज करून पहावा हा प्लॅन जिओद्वारे 28 दिवसांसाठी वैध करण्यात आला आहे. या प्लॅनच्या अंतर्गत तुम्हाला दररोज 0.1MB डेटा दिला जातो आणि या सोबतच 200MB अधिक डेटा जोडला जातो. वरती नमूद केल्याप्रमाणे हा सुद्धा अनलिमिटेड कॉलिंगसाठी मिळणारा प्लॅन आहे, त्यामुळे त्यासोबत तुम्हाला 50 SMS अगदी मोफत दिले जातात. जिओ कडून ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या प्लॅन्स पैकी हे निश्चितच सर्वात स्वस्त असे रिचार्ज प्लॅन्स आहेत(Jio Affordable Plans) पण इंटरनेटसाठी सोयीस्कर आणि स्वस्त अशा शोधात असलेल्या ग्राहकांनी रेग्युलर प्लॅन सोडून यांच्याकडे वळू नये.