बिझनेसनामा ऑनलाईन । गणेश चतुर्थीला म्हणजेच 19 सप्टेंबरला रिलायन्स Jio AirFiber लॉंच करण्यात येणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 46 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) याबाबतची घोषणा केली. जिओ Air Fiber, 5G नेटवर्क आणि सर्वोत्तम वायरलेस तंत्रज्ञान वापरून तुम्हाला घरात किंवा ऑफिस मध्ये वायरलेस ब्रॉडबँड सेवा देईल. जिओ Air fiber बाजारात फक्त 6000 रुपयांच्या किमतीत उपलब्ध होईल.
Jio AirFiber तंत्रज्ञान कसे असेल?
जिओ कोणत्याही वायरशिवाय हवेवर ऑप्टिकल फायबरसारखा वेग पुरवते . तुम्हाला फक्त ते प्लग इन करावे लागेल आणि ते चालू करावे लागेल . हे उपकरण True 5G वापरून अल्ट्रा-हाय-स्पीड इंटरनेटशी कनेक्ट केलेले आहे. जिओ AirFiber सह तुमच्या घर किंवा ऑफिसमध्ये 1GBPS पर्यंतचे इंटरनेट स्पीड तुम्ही अनुभवू शकाल .
जिओ AirFiber ची किंमत : Jio AirFiber
किंमत आणि गुणवत्ता हे दोन मुख्य पैलू आहेत जे वापरकर्ते टेलिकॉम उत्पादन खरेदी करताना विचारात घेतात.परंतु jio ने त्याची देखील काळजी घेतली आहे. जिओ AirFiber बाजारात फक्त 6000 रुपये दरात मिळेल.
कसे असतील प्लॅन :
Jio AirFiber ची दर महिन्याच्या प्लॅनची किंमत 599 रुपये असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच सहा महिन्यांचा प्लॅन 3650 रुपयांमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच, JioCinema सह अनेक अँप्सचे मोफत सबस्क्रिप्शन Jio देऊ शकते. त्यामुळे जीओची प्रतिस्पर्धी कंपनी Airtel ला याचा नक्कीच फटका बसू शकतो.