Jio Bharat V2 : या दिवाळीत आजी-आजोबांना करा खुश!! हा बटणाचा मोबाईल ठरेल त्यांच्यासाठी बेस्ट

Jio Bharat V2 : रिलायंस कंपनी आपल्या Jio या उपकंपनीच्या मदतीने ग्राहकांना नवीन भेट घेऊन आला आहे. Jio मोबाईल फोन नंतर आता जिओ भारत हा नवीन 4G मोबाईल भारतात लॉन्च करण्यात आला आहे. केवळ 999 विकत मिळणारा हा मोबाईल हा सामान्य जनतेसाठी सोयीस्कर ठरणार आहे. Jio Bharat V2 असे या मोबाईलचे नाव असून हा बटणाचा मोबाईल आहे. दिवाळीच्या किंवा सणासुदीच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या आज्जी आजोबाना गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर Jio चा हा बटणाचा मोबाईल बेस्ट पर्याय ठरेल.

सर्वात स्वस्त 4G मोबाईल: Jio Bharat V2

वर्ष 2018 मध्ये जिओ कंपनीने एक फोन बाजार विक्रीसाठी उपलब्ध केला होता, त्या मोबाईलला जेवढं यश मिळालं तेवढाच किंबहुना जास्तीच या नवीन Jio Bharat V2 ला मिळेल अशी असा कंपनीने व्यक्त केली आहे. बाजारात आता एवढे मोबाईल फोन इंटरनेटची सुविधा उपलब्ध करवून देतात त्यात हा सर्वात स्वस्त किमतीत मिळणारा फोन ठरतोय. एकूणच हा मोबाईल कमी किमतीचा आहे तसेच त्याचे वजन सुद्धा केवळ 71 ग्राम एवढेच आहे. हाताळायला एकदम हलका आणि सोपा असा हा Jio Bharat V2 मोबाईल आहे.

मोबाईल फोनमध्ये HD वॉयस कॉलिंग, FM रेडियो, 128 जीबी का एसडी मेमरी कार्ड सपोर्ट यांसारखे फीचर्स आहेत. याबरोबरच तुम्हाला फोन मध्ये 4.5 सेंटीमीटरचा TFT डिस्‍प्‍ले, 0.3 मेगापिक्सलचा कैमरा, 1000mAh ची बैटरी, 3.5mm चे हेडफोन जैक आणि लाउडस्पीकर तसेच टार्च लाईट सुद्धा मिळेल. या मोबाईल मध्ये वापरकर्त्यांना जिओ सिनेमा आणि जिओ सावन या अँपचा एक्‍सेस सुद्धा मिळतोय. विशेष म्हणजे हा मोबाइल 22 भारतीय भाष्यांमध्ये वापरला जाऊ शकतो, त्यामुळे तुमच्या घरातील आजी आजोबांसाठी हे एक खास दिवाळी गिफ्ट नक्कीच ठरू शकतं