Jio Brand : भारतीय बाजारातील सर्वात प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी म्हणजेच रिलायन्स जियो(Reliance Jio). आज ही कंपनी पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली कारण तिने एक खास शिखर काबीज केलं आहे. LIC आणि SBI ला मागे टाकत आत्ताच्या घडीला जियो सर्वात मजबूत ब्रँड बनला आहे. Global-500 2024 ने सादर केलेल्या अहवालानुसार जिओ हा ब्रँड आपल्या देशातील सर्वात प्रसिद्ध ब्रँड बनला आहे, तर जागतिक स्थरावर जिओ ब्रॅण्डचा 17 वा नंबर लागतो. Jio कंपनीचा ब्रँड सामर्थ्य निर्देशांक 88.9 असा आहे. या यादीत जियो शिवाय WeChat, YouTube, Google, Deloitte, Coca-Cola आणि Netflix हे ब्रॅण्ड्स देखील अव्वल स्थानावर पाहायला मिळतात.
Jio Brand नंतर LIC आणि SBI ला कितवे स्थान?
Global-500 2024 च्या यंदाच्या यादीत LIC ही आपल्या देशातील सर्वात प्रसिद्ध विमा कंपनी 23व्या स्थानावर आहे. LIC ने गेल्या दोन दिवसांत शेअर बाजारावर देखील अधिराज्य गाजवलं आणि स्टेट बँकला मागे टाकत आघाडी पकडली होती. Global-500 च्या या यादीत सुद्धा LIC ने देशातील सर्वात प्रसिद्ध आणि अधिकाधिक ग्राहकवर्ग असलेली कंपनी म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाला मागे टाकले आहे, सदर यादीत स्टेट बँकला 24 वं स्थान प्राप्त झालंय. कदाचित तुम्ही थक्क व्हाल पण या यादीत दोन्ही ब्रँडनी Instagram या नावाजलेल्या ब्रॅण्डला मागे टाकलं आहे. विश्वास बसणं कठीण, कारण आजच्या नवीन युगात सर्व तरुणांकडून Instagram ला पसंती दिली जाते, मात्र तरीही भलत्याच कंपन्या Instagram ला मागे टाकण्यात यशस्वी झाल्यात. या सर्व मोठमोठाल्या नावांशिवाय WeChat, YouTube, Google, हॉटेल ब्रँड मरिना बे, रोलेक्स, बँक ऑफ चायना, स्विसकॉम, चॅनेल, स्टेट ग्रिड, EY सारख्या अनेक ब्रॅण्ड्सना 25 सर्वात मजबूत ब्रँडच्या यादीत अव्वल स्थान मिळालं आहे.
रिलायन्स कंपनीकडून वर्ष 2016 मध्ये रिलायन्स जियोची सुरुवात केली होती. तेव्हापासून आत्तापर्यंत कंपनी विविध फेरबदल करत उंच शिखरं काबीज करण्याचा प्रयत्न करीत आहे. जिओच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये(Jio Brand Value) सध्या 14 टक्क्यांनी वाढ झाली असून ती 6.1 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे, तसेच त्याचा ब्रँड इंडेक्स स्कोअरही(Brand Index Score) 89 पर्यंत वाढला आहे आणि याला AAA ब्रँड रेटिंग(Brand Rating) देण्यात आले, म्हणूनच आत्ता जियो हा ब्रँड सर्वात प्रसिद्ध(Jio Brand) बनला आहे.