बिझनेसनामा ऑनलाईन । आपल्या देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणजे जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी. मुकेश अंबानी यांच्या रिलायंस कंपनीच्या अनेक उपकंपन्या आहेत ज्या देशातील विविध क्षेत्रांमध्ये काम करतात. हल्लीच मुकेश अंबानी यांनी आपल्या तिन्ही मुलांना बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे स्थान देऊन व्यवसायातून एक पाऊल मागे टाकले आहे. या अंबानी जोडप्याची एकुलती एक मुलगी म्हणजेच ईशा अंबानी, जी सध्या रिलायंस रिटेल या कंपनीची धुरा सांभाळत आहे आणि या सोबतच आता ईशा अंबानी यांना अजून एक जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ईशा अंबानी यांच्या खांद्यावर आता Jio Financial Services ची सुद्धा धुरा असणार आहे.
ईशा अंबानी यांना नवीन पद: (Jio Financial Services)
रिलायंस रिटेल या उपकंपनीच्या मालकीन ईशा अंबानी यांना अजून एक महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. भारतीय रिझर्व बँककडून आता ईशा अंबानी यांना Jio Financial Services च्या डायरेक्टर पदावर नियुक्त करण्याच्या प्रस्तावावर होकार देण्यात आला आहे. ईशा अंबानी यांच्या सोबत डायरेक्टर म्हणून अंशुमन ठाकूर आणि हितेश कुमार सेठिया यांच्या नावालाही दुजोरा मिळाला आहे. मात्र या नियुक्तीसोबतच रिझर्व बँकने कंपनीला सहा महिन्यांचा काळ मुदत म्हणून देऊ केला आहे. मान्यता पत्रासोबत बँकने म्हटले आहे कि हि नियुक्ती फक्त सहा महिन्यांसाठी वैध असेल आणि या काळात जर का कंपनी प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यास अयशस्वी ठरली तर सर्व कारणांसह तिला पुन्हा अर्ज करावा लागणार आहे, तसेच या पत्रात कंपनीला अंमलबजावणी का करता आली नाही याची करणे स्पष्ट करावी लागणार आहेत.
अशी आहे Jio Financial Services:
Jio Financial Services हि कंपनी यंदाच्या वर्षीच रिलायंस इंडस्ट्रीज पासून वेगळी होत आपला व्यवसाय सांभाळत आहे. डी- मर्जरच्या प्रोसेसमध्ये Jio Financial Servicesचे वेगळे अस्तित्व निर्माण झाले होते. सध्या कंपनीचे मार्केट कॅपिटलायजेशन 1.44 लाख कोटी रुपये एवढे भक्कम असून ईशा अंबानी यांच्या कुशल नेतृत्वाखाली हि कंपनी येणाऱ्या काळात भरपूर प्रगती करू शकते अशी अपेक्षा केली जाऊ शकते.