Jio Financial Services ची RBI ला याचिका; NBFC वरून CIC बनण्याची इच्छा

Jio Financial Services: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणजे मुकेश अंबानी, आणि त्यांची जगप्रसिद्ध कंपनी म्हणजे रिलायंस इंडस्ट्रीज. अंबानी समूहाच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सवर सध्या तिन्ही मुलांची नावं रुजू करण्यात आली आहेत. पैकी ईशा अंबानी या रिलायंस रिटेल या कंपनीची जबाबदारी सांभाळतात, आणि आता त्यांच्यावर नवीन सुरु केलेल्या व्यवसायाची म्हणजेच जिओ फायनान्शियाल सर्व्हिसिसची खिस्त सुपूर्त करण्यात आली आहे. सध्या याच कंपनीकडून रिझर्व बँक ऑफ इंडियाला एक अर्ज देण्यात आला आहे, ज्या अर्जात कंपनीने नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) मधून कंपनीचे मुख्य गुंतवणूक कंपनी (CIC) मध्ये रूपांतर करण्याची विनंती केली आहे.

Jio Financial Services ची RBIला याचिका:

अंबानी समूहाची एक प्रमुख कंपनी म्हणजे नव्याने सुरु झालेली जिओ फायनान्शियाल सर्व्हिसिस. या कंपनीचे आधिपत्य सध्या ईशा अंबानी,अंशुमन ठाकूर आणि हितेश सिंथिया यांच्या हातात आहे. कंपनीने सर्वोच्य बँक समोर एक याचिका ठेवली असून त्यात कंपनीला मुख्य गुंतवणूक कंपनी ( core investment company) बनण्याची इच्छा आहे. रिझर्व बँकच्या मते  core investment company (CIC) या कंपनीची मालमत्ता त्यांच्या समूह कंपन्यांमध्ये इक्विटी, प्राधान्य समभाग (preference shares), परिवर्तनीय रोख (convertibles bonds) किंवा कर्जाच्या स्वरुपात गुंतवली जाते.

बाँड जारी करून पैसे कमावणार नाही : कंपनी

यानंतर एक्सचेंज फाइलिंगमध्ये कंपनीने (Jio Financial Services) बाँड जारी करून निधी उभारणीच्या योजनांच्या वेगवेगळ्या अहवालांचे खंडन केले आहे. कंपनी म्हणते कि त्यांची बाँड जारी करून कोणतेही पैसे उभारण्याची कुठलीही योजना नाही. ही बातमी साफ खोटी आहे.

कंपनीने सेबी (Listing Obligations and Disclosure Requirements) समोर रेग्युलेशन्स, 2015 आणि स्टॉक एक्स्चेंजच्या करारांनुसार सर्व जबाबदाऱ्यांचे पालन करण्यासाठी नेहमीच खुलासे केले आहेत आणि यापुढेही ते करत राहतील असे आश्वासनही दिले आहे.